Monday, August 31, 2026
spot_img
Homeबल्लारपूरखोटी बातमी प्रकाशित करून बदनामी केल्याचा आरोप; पत्रकारांवर कारवाईची मागणी बल्लारपूरमध्ये खाटीक...

खोटी बातमी प्रकाशित करून बदनामी केल्याचा आरोप; पत्रकारांवर कारवाईची मागणी बल्लारपूरमध्ये खाटीक समाजाची पत्रकार परिषद

खोटी बातमी प्रकाशित करून बदनामी केल्याचा आरोप; पत्रकारांवर कारवाईची मागणी बल्लारपूरमध्ये खाटीक समाजाची पत्रकार परिषद

ज्योत्स्ना वानखेडे: स्थानिक मटन व्यावसायिकाविरोधात खोटी व दिशाभूल करणारी बातमी प्रकाशित करून बदनामी केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून, संबंधितांवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी खाटीक समाजाच्या वतीने पत्रकार परिषदेत करण्यात आली.
      माहितीनुसार, दि. २० मार्च रोजी सकाळी सुरज सुरमवार नामक ग्राहकाने संबंधित व्यावसायिकाच्या दुकानातून मटन खरेदी केले. त्यानंतर दि. २२ मार्च रोजी तोच ग्राहक पुन्हा दुकानात येऊन मटनाबाबत आक्षेप घेत वाद घालत, दिलेले मटन बकऱ्याचे नसून इतर जनावराचे असल्याचा आरोप केला. या वादानंतर संबंधित व्यक्तीने पत्रकारांमार्फत महावाणी न्यूज पोर्टल वर खोटी बातमी प्रसिद्ध केल्याचा आरोप व्यावसायिकाने केला आहे.
       सदर बातमीत संबंधित दुकानाचे फोटो नसून इतर दुकानाचे छायाचित्र संपादित करून त्यावर दुकानाचे नाव दाखविण्यात आल्याचा दावा करण्यात आला. तसेच “कुत्र्याचे मटन विक्री” केल्याचा खोटा आरोप करून जाणीवपूर्वक बदनामी केल्याचेही सांगण्यात आले.
       या प्रकरणी व्यावसायिकाने दि. २२ मार्च रोजी बल्लारपूर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली असून, दि. २४ मार्च रोजी खाटीक समाजाच्या वतीनेही संबंधित आरोपी व पत्रकारांवर कारवाईची मागणी करणारे निवेदन देण्यात आले आहे. मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली.
       या घटनेमुळे संबंधित व्यावसायिकासह संपूर्ण खाटीक समाजाची बदनामी झाली असून, व्यवसायावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. ग्राहकसंख्या घटल्याने आर्थिक फटका बसत असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
      पत्रकार परिषदेत संबंधितांवर मानहानीचा दावा दाखल करण्याचा इशाराही देण्यात आला. तसेच अशा प्रकारच्या खोट्या बातम्यांमुळे संपूर्ण मटन मार्केटमधील व्यापारावर परिणाम होत असल्याचे नमूद करण्यात आले. बल्लारपूर येथील मटन बाजारात गोंडपिपरी, आष्टी, राजुरा, सास्ती आदी भागांतील ग्राहक मोठ्या प्रमाणावर येत असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
       या पत्रकार परिषदेला खाटीक समाजाचे ज्येष्ठ व्यवसायिक आनंद कटारे, नगरसेवक भास्कर माकोडे, दुकानदार राजेश दुर्गे, अशोक तुमाने तसेच धनराज पारधी, दिलीप दुर्गे, महेश माकोडे, शेखर तुमाने, पवन तुमाने, विलास पारधी, अनिकेत तुमाने, विकास दुर्गे, हितेश हिकरे, सुरेंद्र कटारे यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page