या पवित्र कार्यक्रमाचे आयोजन सौ. किरण चांदेल (नगरसेविका न. प. बल्लारपूर) यांच्या पुढाकारातून करण्यात आले.
या मंगल प्रसंगी मा. डॉ. अल्का अनिल वाढई (नगराध्यक्षा, न. प. बल्लारपूर) तसेच मा. डॉ. अनिल वाढई (संचालक, जि. म. सह. बँक, चंद्रपूर) यांच्या हस्ते प्रभू श्रीराम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व आरती करून कार्यक्रमाची विधिवत सुरुवात करण्यात आली.
उपस्थित मान्यवर श्री. प्रभाकर मुरकुटे (माजी नगरसेवक),श्री. स्वप्नील दंतुलवार, श्री. श्रीनिवास बुग्गावर, श्री. पटेल जी, श्री. प्रकाश शेंडे,तसेच उपस्थित समस्त जनसमुदाय यांची मोलाची उपस्थिती लाभली.
यानंतर भव्य रामनवमी रॅलीला प्रारंभ करण्यात आला. या रॅलीमध्ये मा. डॉ. अल्का अनिल वाढई व मा. डॉ. अनिल वाढई यांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवून उपस्थितांना उत्साह व प्रेरणा दिली.
रॅलीतील भव्य श्रीराम रथ हा विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. तसेच भारत माता, भारतीय सेना, काली माता, नरसिंह, हनुमानजी तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आकर्षक देखाव्यांनी रॅलीला एक वेगळीच भव्यता प्राप्त करून दिली.
संपूर्ण परिसर “जय श्रीराम” च्या जयघोषाने दुमदुमून गेला आणि वातावरण अक्षरशः राममय झाले.
या रॅलीमध्ये नगरसेविका, नगरसेवक, युवक, महिला व नागरिकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला, ज्यामुळे कार्यक्रमाला भव्यता आणि यश प्राप्त झाले.