Sunday, May 31, 2026
HomeParbhani"शाम ए सरगम" संगीत परिवाराचा अभिनव उपक्रम.
spot_img

“शाम ए सरगम” संगीत परिवाराचा अभिनव उपक्रम.

“शाम ए सरगम” संगीत परिवाराचा अभिनव उपक्रम.

ज्योत्स्ना वानखेडे: हिंदू नववर्षाच्या आरंभी दि. 29 मार्च 2026 रविवार सायंकाळी 5 ते 7 या वेळी ‘कामदा एकादशी’ निमित्ताने भगवंताच्या नुसत्या मुर्तीचे पूजन करुन न थांबता,”जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले” या प्रमाणे सजीव मनुष्य रुपी भगवंताच्या सेवेत ईश्वर आहे या संकल्पनेतून पाथरी जवळील *ॐकार वृध्दाश्रमातील* 35 वृध्द महिला पुरुष बांधवांना आनंद देण्यासाठी,      जवळपास 40 कलाकार सदस्य  असलेल्या *”शाम ए सरगम “* संगीत परिवारातील 10 कलाकारांनी प्रतिनिधित्व करीत वृध्द बांधवांना संगीत मेजवानी सह , उपवास फराळासह उपलब्ध सर्व फळांचे वाटप याप्रसंगी वृध्दाश्रमात जाउन केले.
    या कार्यक्रमात सहभागी कलाकार सर्वश्री मोहन कुलकर्णी (अध्यक्ष), सौ. मानसी व्यवहारे (उपाध्यक्ष), दु. का. कुलकर्णी (कोषाध्यक्ष),अशोक वानरे (सचिव), विनोद मोगल व प्रदीप शिंदे (सहसचिव), अॕड. सुभाष भरदम, पंकज लांडगे, सौ. मिना वानरे आणि शाम आढे यांनी प्रथम सौ. मानसी व्यवहारे यांच्या शारदा स्तवनाने  कार्यक्रमाची सूरुवात करीत वृध्दाश्रमातील बांधवांनी फर्माईश केलेल्या गाण्यासह, एकापेक्षा एक सरस हिंदी, मराठी, भजन, अभंग, भावगीतांचे उत्कृष्ट सादरीकरण करुन वाहवा मिळवली. विशेष म्हणजे वृध्दाश्रमातील दोन महिलांनी सुध्दा सादरीकरण केले. सोबत सौ.विजया शाम आढे आणि मकरंद व्यवहारे उपस्थित होते.सर्व वृध्द बांधवांना खूप आनंद झाला आणि कलाकारांनी पण आनंद घेतला.कार्यक्रम 100%यशस्वी झाला.या प्रसंगी वृध्दाश्रम व्यवस्थापक संचालक डॉ. जगदीश शिंदे आणि गीता दीदींनी सहकार्य केले. व परत पुढील कार्यक्रमाचे निमंत्रण ही दिले…!
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page