ज्योत्स्ना वानखेडे : विसापूर मातोश्री वृद्धाश्रमात नुकताच एक आनंददायी स्नेहभोजन आयोजित करण्यात आले, जेथे वृद्धांच्या चेहऱ्यावर हसू आणि आनंदाची छटा पसरली. या खास कार्यक्रमाचे आयोजन स्वरा कडू यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने करण्यात आले.
कार्यक्रमात स्वराचे वडील प्रवीण कडू, किर्ती कडू, उमेश कडू,कंचन झगडे, श्रावणी कडू, भारती कडू, संगीता राऊत, शंकर महाकाली, लक्ष्मण दुर्गय्या चक्रधर राऊत, यांच्या उपस्थितीत स्नेहभोजन आयोजित करण्यात आले. तसेच संचित राऊत, गुंजन वाघमारे, प्रिन्स वाघमारे, शुभांगी गायकवाड, गौरी गायकवाड, प्रियांशू गायकवाड, पवन डोंगे, अमोल नेवारे, प्रशांत डोलीघर, देशप्रीत झगडे यांचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमात वृद्धाश्रमातील सदस्यांसाठी विविध प्रकारचे स्वादिष्ट जेवणाचे आयोजन करण्यात आले, तसेच उपस्थितांनी वृद्धांच्या सोबत गप्पा मारत आनंदाचे क्षण साजरे केले. स्वरा कडू यांनी वृद्धांना त्यांच्या अनुभवांची आठवण करून दिली आणि प्रेम, स्नेह यांचा संदेश दिला.
या स्नेहभोजनातून वृद्धांना समाजाचा भाग असल्याची जाणीव झाली तसेच त्यांच्या चेहऱ्यावर हसरा प्रकाश उमटला. उपस्थितांनी या उपक्रमाची स्तुती करत वृद्धांच्या हितासाठी असे कार्यक्रम सतत चालवण्याचे आश्वासन दिले.
स्वरा कडू यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने झालेल्या या कार्यक्रमाने उपस्थितांची मनं जिंकली आणि मातोश्री वृद्धाश्रमातील वातावरण उत्साहपूर्ण बनवले.