लॉयट्स मेटल अॅण्ड एनर्जी लि. एम.आय.डी.सी. घुग्घुस, ता. घुग्घुस, जि. चंद्रपूरया प्रकल्पाद्वारे घातक वायु व जल प्रदुषण होत असल्यामुळे मानवी जिवाला धोका निर्माण झाला असल्यामुळे, प्रकल्पाची पर्यावरण परवानगी रद्द करा अशी मागणी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, प्रधान सचीव पर्यावरण मंत्रालय, भारत सरकार नई दिल्ली, मुख्य सचीव मंत्रालय, महाराष्ट्र, अध्यक्ष म.प्र.नि. मंडळ, मंत्रालय, मुंबई, सदस्य सचिव म.प्र.नि. मंडळ, मुंबई, जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्याकडे राजेश बेले, संस्थापक अध्यक्ष, संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्था, चंद्रपूर यांनी तक्रार केलेली आहे.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, चंद्रपूर प्रादेशिक व उपप्रादेशिक कार्यालया अंतर्गत में. लॉयडस मेटल्स व एनर्जी लि. घुग्घुस या लोह कारखान्याला लागुन असलेल्या उसगाव नाल्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात रासायनिक द्रव्य सोडत आहे. त्यामुळे वर्धा नदी प्रदूषित झाली आहे. Electro Static precritator मधून निघालेली धूळ व इतर निर्माण झालेले टाकाऊ पदार्थ जसे की, डोलाचार या उद्योगाद्वारे नियम बाहय पध्दतीने विकला जातो. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पर्यावरण परवानगी (consent to operate) मध्ये विकण्याची पनवानगी नाही. ही डस्ट पुढे कोलवाशरी कोळशात मिळविल्या जाते. हा मिलावटी कोळसा पुढे उद्योगामध्ये जाळण्यात येतो. या कारखान्यात सुध्दा ते स्वतः मिक्सिन्ग केलेला कोळसा रोटरी किलनमध्ये जाळतात. खराब कोळसा जाळल्यामुळे मर्यादेपेक्षा अधिक वायू प्रदूषक घटक निर्माण होतात व हवेत पसरतात.
या उद्योगातील हवा प्रदूषण नियंत्रण यंत्रणेची क्षमता कमी पडते. सायंकाळी व रात्री या उद्योगाची हवा प्रदूषण नियंत्रण यंत्रणा बंद ठेवली जाते ज्यामुळे खूप मोठया प्रमाणावर धुर, धुळ हवेत उडते व लांब परिसरातील शेतीपिकां वर पडते. यामुळे नेहमी पिकांचे नुकसान होते. कारखान्यातून esp डस्ट व (dolachar) डोलाचार ची वाहतूक व विक्री रात्रीला केली जाते. कारखान्यातील सर्व हवा प्रदूषण नियंत्रण यंत्रणा निकामी व पडीक झालेल्या असतात व बहुतांश ठिकाणी त्यांची क्षमता संपलेली आहे. उत्पादन प्रक्रियेतील सांडपाण्यात ग्रीस व कोळसा मिश्रीत असते व सतत नाल्यात सोडल्या जाते जे पुढे नदीत मिळते. म. प्र. नि. मंडळ पर्यावरण मंजुरीच्या अटिंचे उघडपणे उल्लंघन केले जात आहे. मंजुरी पेक्षा दुप्पट प्रमाणात उत्पादन केले जाते. यामध्ये शासनाचा उत्पादन कर, आयकर करोडो रूपयांनी बुडविला जात आहे. भेसळ प्रतिबंधक कायद्याचे सर्रासपणे उल्लंघन केले जात आहे. कारखान्यात आलेला कच्चा माल व केलेले उत्पादन याच्या ख-या नोंदी केल्या जात नाही व शासनाचा महसूल बुडविल्या जातो. या कारखान्याचे environment ऑडिट, labour audit, income tax audit केले जात नाही. उत्पादनाचे व उत्पन्नाचे ऑडिट केले जात नाही व उत्पादन कर व आय कर भरले जात नाही. या सर्व प्रकारा मूळे प्रदूषण सतत वाढले आहे.
लोह खनिज कारखान्याकडून पर्यावरण कायद्याचे व शासकीय कायद्याचे उल्लंघन होत असल्यामुळे कारखान्या वर कायदेशीर कारवाई करून पर्यावरण परवानगी रद्द करण्यात यावी.
म.प्र.नि.मंडळ, चंद्रपूर प्रादेशिक व उपप्रादेशिक कार्यालय प्रादेशिक अधिकारी श्री. तानाजी यादव, उपप्रादेशिक अधिकारी, श्री. सुशील राठोड, क्षेत्राधिकारी श्री. नंदकिशोर लोमटे व श्री. स्वप्नील लिगडे हे अधिकारी कारखान्याकडून खूप मोठ्या प्रमाणात देवाणघेवाण करीत असल्यामुळे यांची आयपेक्षा जास्त संपत्ती जमा केलेली आहे त्यामुळे त्यांच्यावर उच्चस्तरीय चौकशी करून फौजदारी गुन्हा दाखल करून निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी राजेश बेले संस्थापक अध्यक्ष संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्था यांनी केली आहे.