*ज्योत्स्ना वानखेडे*
जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर या शाळेत शिपाई वामनभाऊ बोबडे यांना दिनांक: ३०/०६/२०२६ रोजी सेवानिवृत्ती कार्यक्रम घेऊन निरोप देण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी एस. एम. बोबडे मुख्याध्यापक, प्रमुख पाहुणे आर. के. वानखेडे सेवानिवृत्त शिक्षक,
सत्कारमूर्ती वामनभाऊ बोबडे पत्नी सौ. शकुंतला बोबडे , राकेश जीवतोडे(जावई) यांची मंचावर उपस्थित होती.
प्रथमता: मंचावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या फोटोला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
आपल्या प्रास्ताविकात आर. बी. अलाम यांनी सांगितले की, वामनभाऊ बोबडे यांनी शिपायाची चतुर्थ श्रेणी नोकरी करताना आपल्या परिवाराची प्रगती केली. यु. के. रांगणकर यांनी सांगितले की, वामनभाऊ बोबडे हे आपल्या जनता परिवाराच्या कुटुंबातून निवृत्त होत आहे परंतु त्यांच्या सहकार्याच्या आठवणी कायम राहतील. गणेश चंदावार बाबू, राकेश जीवतोडे (जावई) यांनी सुद्धा वामनभाऊ बोबडे यांच्या बद्दल माहिती दिली.
शाळेच्या वतीने वामनभाऊ बोबडे यांचा पत्नी सौ शकुंतला बोबडे सोबत शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
प्रमुख पाहुणे आर. के. वानखेडे सेवानिवृत्त शिक्षक यांनी वामनभाऊ बोबडे सोबत काम करत असताना पुस्तक वाटप, शालेय पोषण आहार वाटप, शिष्यवृत्ती वाटप, कोरोना काळातील अनुभव आदी बाबत माहिती दिली. याप्रसंगी वामन भाऊ बोबडे यांनी सुद्धा आपले विचार व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषण करताना एस. एम. बोबडे मुख्याध्यापक यांनी सांगितले की, सन 1998 पासून साखरवाही च्या शाळेत एकमेकास मदत करू असा त्यांचा स्वभाव होता. ते आज सेवानिवृत्त होत आहे.
कार्यक्रमाचे संचालन एस. एम. लोधे मॅडम व आभार प्रदर्शन एस. एम. चव्हाण यांनी केले.
कार्यक्रमात वाल्मीक खोंडे, जगदीश कांबळे, इंद्रभान अडबाले, रोहित बोबडे, अंकिता बोबडे व प्रिया जीवतोडे आदी उपस्थित होते.