कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री डी के शिवकुमार राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या ११ व्या महाअधिवेशनाचे उद्घाटन करणार.
बंगलोर येथे ७ ऑगस्ट २०२६ ला महाअधिवेशन *ज्योत्स्ना वानखेडे*: राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ११ वे अधिवेशन ज्ञानज्योती ऑडिटोरियम डॉ. मनमोहन सिंग सिटी युनिव्हर्सिटी बेंगलूरु , ७ ऑगस्ट २०२६ रोजी होत आहे. या अधिवेशनाचे उद्घाटन कर्नाटक राज्यात मुख्यमंत्री डी के शिवकुमार करणार आहे.
महासंघ दरवर्षी केंद्र सरकारकडे विविध मागण्यांसाठी ७ ऑगस्टला अधिवेशन आयोजित करत असते. केंद्र सरकारने तात्काळ ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी आणि जनगणनेत ओबीसींचा कॉलम टाकण्यात यावा, आरक्षणाची मर्यादा ५० टक्के वरून हटवण्यात यावी व लोकसंखेच्या प्रमाणात आरक्षण देण्यात यावे, ओबीसी लोकसंख्येच्या प्रमाणात अर्थसंकल्पात तरतूद करण्यात यावी, स्वतंत्र केंद्रीय ओबीसी मंत्रालयाची स्थापना करण्यात यावी, ४ मार्च २०२१ च्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रद्द करण्यात आलेले ओबीसीचे स्थानिक स्वराज्य संस्था मधील राजकीय आरक्षण पूर्ववत सुरू करण्याकरिता संविधानाच्या कलम २४३ डी (६) व कलम २४३ टी (६) मध्ये सुधारणा करण्यात यावी, देशातील ओबीसींना लोकसंखेच्या प्रमाणात २७ टक्के राजकीय आरक्षण लागू करण्यात यावे, १३ सप्टेंबर २०१७ पासून क्रिमिलेअरची मर्यादा वाढलेली नाही, ओबीसी समाजाला लावण्यात आलेली क्रिमिलेअरची घटनाबाह्य अट त्वरित रद्द करण्यात यावी व ती रद्द होईपर्यंत मर्यादा २० लाख करण्यात यावी, महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर “भारतरत्न” पुरस्कार बहाल करण्यात यावा, मागण्या या अधिवेशनात करण्यात ठराव घेण्यात येतील. अधिवेशनाचे उद्घाटन करण्यासाठी कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री यांना निमंत्रण देण्यात आले या वेळी कर्नाटक राज्याचे काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बी के हरिप्रसाद , राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ बबनराव तायवाडे, महासचिव सचिन राजुरकर, बीसी वेलफेअर असोसिएशन अध्यक्ष तेलंगणा श्रीनिवास जाजुला, बीसी वेलफेअर असोसिएशन आंध्रप्रदेश अध्यक्ष शंकर अण्णा, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे कर्नाटक अध्यक्ष लक्ष्मण यादव विक्रम गौड, श्याम कुर्मा ओबीसी बांधवांनी उपस्थित होते.