गौ सन्मान यात्रेचे छोटा बाजार चौकात भाजप महानगरतर्फे उत्स्फूर्त स्वागत

*Jyotsna Wankhede*: गोवंश संरक्षण, संवर्धन आणि गोमातेच्या सन्मानासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘गौ सन्मान यात्रे’चे चंद्रपूर शहरातील छोटा बाजार चौक येथे भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगरच्या वतीने उत्स्फूर्त स्वागत करण्यात तसेच यावेळी भाजप महानगरच्या वतीने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
यावेळी प. पु. मनीषजी महाराज, भारतीय जनता पार्टीचे माजी महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, बलराम डोडाणी, वंदना हातगावकर, सरिता घटे, मनपा गटनेते चंद्रशेखर शेट्टी, तुकुम मंडळ अध्यक्ष स्वप्नील डुकरे, अमोल शेंडे, नकुल वासमवार, राकेश नाकाडे, सुमित बेले, ईश्वर वाघमारे, बाळू कोल्हनकर दिंची उपस्थिती
यावेळी भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच गोसेवकांनी यात्रेचे पुष्पवृष्टी करून स्वागत केले. भारताच्या सांस्कृतिक परंपरेत गोमातेला अत्यंत महत्त्वाचे स्थान असून, गोसंवर्धन आणि गोसेवेचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी ही यात्रा महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले.
या प्रसंगी गोमातेच्या संरक्षणासाठी जनजागृती करण्याचा तसेच गोसेवा आणि राष्ट्रसेवेचा संकल्प अधिक बळकट करण्याचे आवाहन करण्यात आले. यात्रेत सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत वातावरण भक्तिमय आणि उत्साहपूर्ण केले.









