Saturday, August 15, 2026
spot_img
HomeGondpipariगोवंशाची अवैध वाहतूक करणाऱ्या बोलेरो पिकअप वाहनासह ४.९० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त;...

गोवंशाची अवैध वाहतूक करणाऱ्या बोलेरो पिकअप वाहनासह ४.९० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त; पोलीस स्टेशन गोंडपिंपरीची कारवाई

गोवंशाची अवैध वाहतूक करणाऱ्या बोलेरो पिकअप वाहनासह ४.९० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त; पोलीस स्टेशन गोंडपिंपरीची कारवाई

*ज्योत्स्ना वानखेडे*:

गोंडपिंपरी पोलीस ठाण्याच्या पथकाने दिनांक १४ ऑगस्ट २०२६ रोजी गोंडपिंपरी परिसरात नाकाबंदी करून गोवंशाची अवैधरीत्या वाहतूक करणाऱ्या बोलेरो पिकअप वाहन क्रमांक MH 34 CQ 1229 वर कारवाई केली.

पोलीस पथकास मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे मौजा भनारहेट्टी गावाजवळ नाकाबंदी करण्यात आली होती. दरम्यान विठ्ठलवाडा मार्गे येणारे सदर बोलेरो पिकअप वाहन संशयास्पदरीत्या आढळून आल्याने पोलिसांनी वाहन थांबवून तपासणी केली.

वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये एकूण ४ गोवंशीय जनावरे आढळून आली. सदर जनावरांच्या वाहतुकीबाबत आवश्यक कागदपत्रे सादर करण्यात आली नाहीत. तसेच जनावरांना वाहनामध्ये दाटीवाटीने व त्यांच्या चारा-पाण्याची सोय न करता वाहतूक केल्याचे आढळून आले.

या कारवाईमध्ये

* २ पांढऱ्या रंगाचे बैल — अंदाजे किंमत ₹५०,०००/-

* १ लाल रंगाचा बैल — अंदाजे किंमत ₹२५,०००/-

* १ लाल रंगाचा गोरा — अंदाजे किंमत ₹१५,०००/-

* बोलेरो पिकअप वाहन क्रमांक MH 34 CQ 1229 — अंदाजे किंमत ₹४,००,०००/-

असा एकूण ₹४,९०,०००/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी बोलेरो पिकअप वाहनाचा चालक प्रफुल्ल राजाजी गददे, वय ३३ वर्षे, धंदा ड्रायव्हर, रा. नांदगाव, ता. मुल, जि. चंद्रपूर तसेच करण सुधाकर झाडे, वय २३ वर्षे, धंदा मजुरी, रा. चेकविठ्ठलवाडा, ता. गोंडपिंपरी, जि. चंद्रपूर यांच्याविरुद्ध महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम १९७६ मधील कलम 5A,5B,9,11 तसेच प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० मधील संबंधित कलमांन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.

जप्त करण्यात आलेल्या गोवंशीय जनावरांना पुढील वैद्यकीय तपासणी करून सुरक्षित ठिकाणी देखभालीसाठी ठेवण्यात आले आहे.

गोवंशाची अवैध वाहतूक व पशूंच्या छळाविरुद्ध कायदेशीर कारवाई यापुढेही प्रभावीपणे सुरू राहणार आहे.सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री आयुष नोपानी, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, पोलीस उपअधीक्षक सत्यजित आमले यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार रमेश हत्तीगोटे,Gpsi वसंत कोसमशिले ,HC मुनेश्वर रात्रे पोलीस अंमलदार अतुल तोडासे,तिरुपती गोडसेलवर,प्रविण कडूकर,यांनी केली आहे.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page