*बोर्डा गावातील भूमी फार्महाऊस मधील जुगार अड्ड्यावर रामनगर पोलीसांचा छापा.*
*जुगार खेळणारे व खेळविणाऱ्या फार्महाऊस चालकासह १६ लोकांवर गुन्हा दाखल.*
*कि. ₹४७,६४,०९०/- रु. कि.चे जुगाराचे साहित्य जप्त.*
*ज्योत्स्ना वानखेडे*:
रामनगर पोलीस स्टेशन हद्दीत भूमी रेस्टहाऊस, बोर्डा मध्ये काही लोक अवैधरित्या हारजित चा जुगार खेळत व खेळवीत असल्याची गोपनीय माहिती वरून मा. श्री. प्रमोद चौगुले, उपविभागीय पोलीस अधिकारी, चंद्रपूर यांचे नेतृत्वात पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके मॅडम पोलीस स्टेशन रामनगर व शोध पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी छापा नियोजन करून बोर्डा गावातील भूमी फार्महाऊसवर दि. १५/०८/२०२६ रोजी १७/०० वा. छापा घातला असता तेथे जुगार खेळणारे व खेळविणारे एकूण १५ लोक व जुगार अड्डा चालविणारा हॉटेल चालक *शामराव व्यंकटेश आनंदवार*, रा. हनुमान नगर, तुकुम, चंद्रपूर हे मिळून आल्याने त्यांच्यावर छापा कारवाई करून त्यांचे कब्जातून जुगाराचे साहित्यासह रोख रक्कम व जुगार खेळण्यासाठी येण्याची व तेथून जाण्याची साधने असा *एकूण ₹४७,६४,०९०/- रु. चा मुद्देमाल जप्त* केला आहे. त्याबत त्यांच्यावर पोलीस स्टेशन रामनगर येथे *अप. क्र. १०१४/२०२६ कलम ४, ५ महाराष्ट्र जुगार कायदा* नुसार गुन्हा दाखल केला आहे.
वरील कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपानी व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रमोद चौगुले यांचे नेतृत्वात रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके, सहा. पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे, स.पो.नि. हनुमान उगले, पोलीस उप निरीक्षक कृष्णा दराडे, पोलीस अंमलदार आनंद खरात, प्रकाश बलकी, रामप्रसाद नैताम, बाबा नैताम, रविकुमार ढेंगळे, जितेंद्र आकरे, मिलींद दोडके, मनिषा मोरे, पंकज ठोंबरे, संदिप गेडाम, सुरेश कोरवार, प्रकाश मडावी, पंकज पांदे, ब्ल्युटी साखरे, सुरज शेडमाके, मंगेश शेंडे, कुमोद खनके, संदिप भोयर, संजू देशीवाले, संदेश चुनारकर, सतिष डांगे, राकेश पिंपळकर, यांनी केली आहे.