HomeBhisi*अट्टल ॲल्युमिनियम तार चोरट्यांना भिसी पोलीसांनी ठोकल्या बेड्या, ७,०१,०००/- रु. चा मुद्देमाल... Bhisi *अट्टल ॲल्युमिनियम तार चोरट्यांना भिसी पोलीसांनी ठोकल्या बेड्या, ७,०१,०००/- रु. चा मुद्देमाल हस्तगत करून केली यशस्वी कारवाई* By Ballarpur Varta August 26, 2026 23 Share FacebookTwitterPinterestWhatsApp *अट्टल ॲल्युमिनियम तार चोरट्यांना भिसी पोलीसांनी ठोकल्या बेड्या, ७,०१,०००/- रु. चा मुद्देमाल हस्तगत करून केली यशस्वी कारवाई* *ज्योत्स्ना वानखेडे*: तक्रारदार नामे कृपाल महादेव लांजे, वय-४० वर्ष, धंदा-नोकरी कनिष्ठ अभियंता विज वितरण केंद्र भिसी, ता. चिमूर, यांनी भिसी पोलीस स्टेशनला एम.एस.ई.डी. चा मौजा टिटवी शेतशिवारात कृषी पंपांना जोडणारा २१ स्पॅन इलेक्ट्रिक सप्लायचा ॲल्युमिनियम तार किं. १,५१,०००/- रु. चा दि. १२/०८/२०२६ ते दि. १८/०८/२०२६ दरम्यान कुणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरल्याबाबत तक्रार दिल्याने अज्ञात आरोपीविरुद्ध भिसी पोलीसांनी गुन्हा नोंद करून, तपासाची चक्रे फिरवुन आरोपी नामे ०१) मनिष उर्फ चंद्रभान सुभाष वाकडे, वय-२९ वर्ष, ०२) फरार आरोपी सोमेश्वर चौधरी, दोन्ही रा. पारडपार, ता. चिमूर, यांनी ॲल्युमिनियम तार चोरून जांभूळघाट, ता. चिमूर, जि. चंद्रपूर, येथे राहणारे भंगार दुकानदार ०१) स्वप्निल सुनिल हजारे, वय-२० वर्ष, ०२) कुणाल गणेश हजारे, वय-१९ वर्ष, यांचे भंगार दुकानात विकल्याचे निष्पन्न झाल्याने आरोपी ०१) स्वप्निल सुनिल हजारे, वय-२० वर्ष, ०२) कुणाल गणेश हजारे, वय-१९ वर्ष, दोन्ही रा. जांभूळघाट, ता. चिमूर, जि. चंद्रपूर, ०३) मनिष उर्फ चंद्रभान सुभाष वाकडे, वय-२९ वर्ष, रा. पारडपार, ता. चिमूर, यांना दि. २०/०८/२०२६ रोजी गुन्ह्यात अटक करून, मा. न्यायालयात हजर करून दि. २४/०८/२०२६ पावेतो पिसीआर मंजूर करण्यात आला होता. आरोपीत इसम सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. गुन्ह्याचा तपासात, गुन्ह्यात चोरी गेलेला २१ स्पॅन ॲल्युमिनियम तार, किं. १,५१,०००/- रु., गुन्ह्यात वापरलेले पिक अप वाहन किं. ५,००,०००/- रु. व स्प्लेंडर मो.सा. कि. ५०,०००/- रु. असा एकूण ७,०१,०००/- रु. चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. फरार आरोपी सोमेश्वर काशिनाथ चौधरी, रा. पारडपार, ता. चिमूर याचे शोधार्थ पथके रवाना करण्यात आली आहे. सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक चंद्रपूर श्री. आयुष नोपानी सा., अपर पोलीस अधिक्षक चंद्रपूर, श्री. ईश्वर कातकडे सा., उपविभागीय पोलीस अधिकारी चिमूर श्री. दिनकर ठोसरे, यांचे मार्गदर्शनात पोनि. अमोल काचोरे, सपोनि सर्वेश बेलसरे, स्थागुशा चंद्रपूर, सपोनि मंगेश भोंगाडे, ठाणेदार पो.स्टे. भिसी, पोहवा नितिन कुरेकार, पोहवा प्रमोद कोटनाके, पोअं अमोल सावे, चापोअं गजानन मडावी, स्थागुशा चंद्रपूर, स.फौ. बाळकृष्ण जिभकाटे, पोहवा सुनिल घोडमारे, पोअं सतिश झिलपे, पोअं मंगेश चौधरी, पोअं वैभव गोहणे पो.स्टे. भिसी यांनी कार्यवाही पार पाडली. Share FacebookTwitterPinterestWhatsApp Previous article*लायड्स लोह खनिज उद्योगाची पर्यावरण परवाणगी रद्द कराः राजेश बेले*Next article*बल्लारपूर मे ईद मिलादुन्नबी कार्यक्रम लिया गया*Raju Kisanrao WankhedeEditor RELATED ARTICLES - Advertisment - - Advertisment - Recent News *चंद्रपूर जिल्ह्यातील खाजगी शिक्षण संस्थेतील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या संचिका जमा करण्याचे काम युद्ध पातळीवर* August 26, 2026 *बल्लारपुरात रेतीचा साठा; वैध की अवैध* August 26, 2026 *महात्मा गांधी स्मारक परिसरात बॅनर तथा दुकान बेधडक* August 26, 2026 *ईद मिलादुन्नबी कमिटी, बल्लारपूर यांच्या वतीने हजरत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम (स.अ.) यांच्या १५०१ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रम* August 26, 2026 Load more Most Popular दुचाकी वाहनांसाठी नवीन नोंदणी क्रमांकाची मालिका सुरू होणार March 22, 2024 विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सा दृष्टिकोन निर्माण व्हावे – आ. सुधाकर अडबाले January 13, 2025 चिंतामणी हायस्कूल विसापूर येथे ” आनापान प्रशिक्षण ” सत्र संपन्न September 28, 2024 राजीव गांधी इंजिनियरिंग महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी February 19, 2026 Load more