Friday, September 11, 2026
spot_img
HomePolice*स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरची मोठी कारवाई: ६५ गोवंशाची क्रूर तस्करी रोखली; २७.८२...

*स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरची मोठी कारवाई: ६५ गोवंशाची क्रूर तस्करी रोखली; २७.८२ लाखांच्या मुद्देमालासह ३ तस्करांना बेड्या*

*स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरची मोठी कारवाई: ६५ गोवंशाची क्रूर तस्करी रोखली; २७.८२ लाखांच्या मुद्देमालासह ३ तस्करांना बेड्या*

*ज्योत्स्ना वानखेडे*:
स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूरच्या पथकाने प्राण्यांच्या अवैध तस्करीविरुद्ध एक मोठी धडक कारवाई केली आहे. दिनांक ०६ सप्टेंबर २०२६ रोजी घुग्घुस पोलीस ठाण्याच्या हद्दीत पिपरी फाटा (धानोरा – गडचांदूर रोड) परिसरात सापळा रचून अत्यंत अमानुषपणे आणि क्रूरतेने वाहतूक केली जाणारी ६५ जनावरे (गोवंश) जप्त करण्यात आली आहेत. कोणतीही चारा-पाण्याची व्यवस्था न करता १४ चक्की अशोक लेलँड ट्रकमध्ये जनावरांना अत्यंत दाटीवाटीने कोंबल्यामुळे २ जनावरांचा जागीच मृत्यू झाला, तर ६३ जनावरांना पोलिसांनी सुखरूप जीवदान दिले. जप्त करण्यात आलेली सर्व जनावरे पुढील योग्य उपचार, चारा-पाणी आणि संरक्षणासाठी तात्काळ ‘प्यार फाउंडेशन, पडोली’ येथे दाखल करण्यात आली आहेत. या कारवाईत पोलिसांनी २७ लाख ८२ हजार रुपयांचा एकूण मुद्देमाल जप्त केला असून ३ आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
 *आरोपी*
1.ओमप्रकाश मुरलीधर कावळे (वय ३८, रा. यशोधरा नगर, नागपूर – ट्रक चालक)
2.कलीम सईद मलीक (वय ३३, रा. कैलासपूर, उत्तर प्रदेश – मजूर)
3.शाहरूख मोहम्मद अयुब मलीक (वय ३०, रा. कैलासपूर, उत्तर प्रदेश –
*फरार आरोपी* 
4. इरफान शेख (रा. गडचांदूर, जिल्हा: चंद्रपूर)
5. तौसिफ भाई निजाम अहमद (रा. नागपूर)
6. अरबाज कुरेशी (रा. नागपूर)(जप्त केलेला ट्रक औरंगाबाद येथील रहिवासी जावेद पठाण माजिद पठाण याच्या मालकीचा असल्याचे निष्पन्न झाले आहे.)
*एकूण जप्त मुद्देमाल*
 लेलँड ट्रकची किंमत: ₹ १५,००,०००/-
गोवंश जनावरांची किंमत: ₹ १२,६०,०००/-
मोबाईल फोन्स व इतर साहित्य: ₹ २२,०००/-
या गुन्ह्याप्रकरणी आरोपींविरुद्ध घुग्घुस पोलीस ठाण्यात प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम १९६०, महाराष्ट्र प्राणी संरक्षण (सुधारित) अधिनियम २०१५ च्या कडक कलमांसह नवीन भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास किल्ल्याच्या पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत.
*कारवाई पथक – राजुरा/गडचांदुर उपविभाग,LCB चंद्रपूर*.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page