Wednesday, September 23, 2026
spot_img
HomeEducation*अनुष्का फडकाडेची ज्युनियर राष्ट्रीय थ्रोबॉल स्पर्धेसाठी निवड; विद्यालयाच्या वतीने हार्दिक अभिनंदन*

*अनुष्का फडकाडेची ज्युनियर राष्ट्रीय थ्रोबॉल स्पर्धेसाठी निवड; विद्यालयाच्या वतीने हार्दिक अभिनंदन*

*अनुष्का फडकाडेची ज्युनियर राष्ट्रीय थ्रोबॉल स्पर्धेसाठी निवड; विद्यालयाच्या वतीने हार्दिक अभिनंदन*

*ज्योत्स्ना वानखेडे*:

मोहसीनभाई जव्हेरी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, बल्लारपूर येथील प्रतिभावान विद्यार्थिनी कुमारी अनुष्का भास्कर फडकाडे हिची ज्युनियर राष्ट्रीय थ्रोबॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल विद्यालय परिवाराच्या वतीने तिचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले.

या प्रसंगी विद्यालयाच्या प्राचार्या मा. असमा खान मॅडम, क्रीडा शिक्षिका शबाना मॅडम, तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अनुष्काचे अभिनंदन करून तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

राष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेत अनुष्काने उत्कृष्ट कामगिरी करून आपल्या विद्यालयाचे नाव उज्ज्वल करावे आणि भविष्यात यशाची नवनवीन शिखरे गाठावीत, अशा शुभेच्छा विद्यालय परिवाराने व्यक्त केल्या.

अनुष्काला तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page