Friday, September 25, 2026
spot_img
Homeबल्लारपूर*कथित झाडू घोटाळ्याची निष्पक्ष आणि पारदर्शी चौकशी होईल- नगराध्यक्ष अल्का वाढई*

*कथित झाडू घोटाळ्याची निष्पक्ष आणि पारदर्शी चौकशी होईल- नगराध्यक्ष अल्का वाढई*

*कथित झाडू घोटाळ्याची निष्पक्ष आणि पारदर्शी चौकशी होईल- नगराध्यक्ष अल्का वाढई*

*ज्योत्स्ना वानखेडे*:

चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर नगर पालिके अंतर्गत खरेदी करण्यात आलेल्या कथित झाडू घोटाळ्याच्या संबंधाने स्पष्टीकरण देण्यासाठी नगराध्यक्ष अल्का वाढई यांच्या दालनात नुकतीच पत्रकार परिषद घेण्यात आली.या कथित घोटाळा प्रकरणी नगराध्यक्ष अल्का वाढई, उपनगराध्यक्ष देवेंद्र आर्य, गटनेते अब्दुल करीम यांच्या वतीने पालिका प्रशासनाची भूमिका स्पष्ट करण्यात आली.

वैयक्तिक आरोप प्रत्यारोपातून झाडू घोटाळ्याचा बाऊ करून पालिकेची आणि बल्लारपूर शहराची बदनामी करण्याचा राजकीय डाव आखून हा कथित झाडू घोटाळा पुढे करून कुणाला वैयक्तिक रित्या बदनाम करण्याचा प्रयत्न होत असेल तर आपणही वैयक्तिक स्तरावर त्याची उत्तरे देण्यास सक्षम असल्याचे मत पालिकेचे उपनगराध्यक्ष तथा स्वच्छता सभापती देवेंद्र आर्य यांनी मांडले. या कथित झाडू घोटाळ्याच्या नावाखाली कुणालाही वैयक्तिक टार्गेट न करता आरोप करणाऱ्यांनी घोटाळ्याच्या आरोपा संबंधाने उच्च आणि निष्पक्ष चौकशीचे समर्थन केले पाहिजे,असे आवाहन बल्लारपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष अल्का वाढई,उपनगराध्यक्ष देवेंद्र आर्य,गटनेते अब्दुल करीम यांनी संयुक्तिक रित्या केले आहे.

बल्लारपूर नगर पालिकेतील नगराध्यक्ष अल्का वाढई यांच्या दालनात आयोजित पत्रकार परिषदेत कथित स्वरूपात झालेल्या झाडू घोटाळ्याच्या आडून  वैयक्तिक बदनामी करणाऱ्या विरोधकांना सडेतोड उत्तरे देत पालिका शासनाने आपली भूमिका या पत्रकार परिषदेतून आज स्पष्ट केली. खरंच हा घोटाळा झाला असेल तर सबंधित दोषींवर कडक कार्यवाही व्हावी असे संयुक्तिक मत नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि गटनेत्यानी मांडले.

या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सत्य बाहेर आणण्याची मागणीही मुख्याधिकारी विशाल वाघ यांच्याकडे लेखी निवेदना द्वारे केली असल्याचे सांगत खरच हा कथित घोटाळा झाला असेल तर या घोटाळ्याशी सबंधित कुणाचाही मुलाहिजा केला जाणार नसल्याचे सांगितले. विशेष म्हणजे झाडू पुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराला कोणतेही बिल अदा केले नसल्याचे उपनगराध्यक्ष देवेंद्र आर्य यांनी स्पष्ट करत मुख्याधिकाऱ्यांनी याबाबत जिल्हा मोजमाप अधिकाऱ्यांना पत्र पाठवून निष्पक्ष चौकशी करण्याची सूचना केली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान निष्पक्ष चौकशी पूर्ण होईपर्यंत या गोदामाला लागलेली सील कायम राहील असेही या पत्रकार परिषदेत स्पष्टपणे नमूद करण्यात आले.

*गोल पुलिया समस्येवर  कायमस्वरूपी तोडग्याचा प्रयत्न – गटनेते अब्दुल करीम*

गोल पुलियाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी लवकरच तांत्रिक उपाययोजना करण्यात येणार असल्याचे गटनेता अब्दुल करीम यांनी सांगितले.या पूला बाजूला असलेली मोठी आणि खोल विहीर बुजवण्यात आली. तथा जवळील नैसर्गिक तळे संपुष्टात आल्याने पाण्याची नैसर्गिक शक्ती आपला निचरा करण्यासाठी मार्ग शोधत असल्याने प्रसंगी गोल पुलिया परिसरात मोठे झरे निर्माण झाले आहे. यावर तात्पुरता उपाय शक्य नसल्याने या गोल पुलियात खड्डे आणि पाणी साचलेले असते.पण गणेश विसर्जनाची बाब लक्षात घेता तात्पुरत्या स्वरूपात यावर तोडगा काढल्या गेल्याची हमी गटनेते अब्दुल करीम यांनी दिली.

*नवरात्रीत शहर काँग्रेस कडून भव्य गरबा स्पर्धा;* 

निःशुल्क प्रवेशफी असणाऱ्या नवरात्री गरबा महोत्सवात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात भाग घ्यावा यासाठी नियोजन केले जात असून आगामी नवरात्रीनिमित्त काँग्रेस पक्षातर्फे भव्य गरबा स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहितीही नगराध्यक्ष अल्का वाढई यांनी यावेळी दिली.निःशुल्क असलेली ही गरबा स्पर्धा आहे. काँग्रेसच्या जेष्ठ नेत्री रजनी हजारे यांच्या नेतृत्वात आणि मार्गदर्शनात होणार आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदाची पुरस्काराची रक्कम दुप्पट करण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष डॉ. अलका वाढई यांनी दिली.या गरबा स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग घेण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page