*अंमली पदार्थमुक्त चंद्रपूरच्या दिशेने आणखी एक पाऊल : २४ ग्रॅम एमडी पावडर जप्त. आरोपी यास बुटीबोरी पोलीसांच्या मदतीने पाठलाग करून घेतले ताब्यात.*
*ज्योत्स्ना वानखेडे*:
चंद्रपूर शहरात अंमली पदार्थांची विक्री व तस्करी करणाऱ्या इसमांवर प्रभावी कार्यवाही करण्याच्या अनुषंगाने मा. पोलीस अधीक्षक श्री आयुष नोपानी सर यांनी सर्व वरिष्ठ अधिकारी व ठाणे प्रभारी अधिकारी यांना सूचना दिल्या होत्या. त्याबाबत पो स्टे रामनगर प्रभारी अधिकारी प्रभावती एकुरके यांनी पो स्टे रामनगर शोध पथकास सूचना व मार्गदर्शन केले त्यानुसार पो स्टे रामनगरच्या गुन्हे शोध पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे इंदिरानगर येथील राहणारा हनिफ करीम शेख याच्या घरी जावुन छापा कार्यवाही केली असता त्याच्या घरी अंमली पदार्थ (एम डी पावडर) मिळून आला.
आरोपी याला पोलीस आल्याची भनक लागताच त्याने नागपूरच्या दिशेने पळ काढला. त्याअनुषंगाने गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने आरोपीचा पाठलाग केला असता आरोपी नागपूरच्या दिशेने जात असल्याचे आढळून आले. त्याअनुषंगाने आरोपीची माहिती पोलीस निरीक्षक बुटीबोरी यांना दिली असता त्यांनी तात्काळ घटनेचे गांभीर्य ओळखून आरोपी हनिफ शेख याला बुटीबोरी टोल प्लाझा याठिकाणाहून ताब्यात घेतले व आरोपीच्या मागे येणाऱ्या रामनगर पोलीसांच्या ताब्यात दिले. अशा प्रकारे २४.२६० ग्रॅम मेफेड्रोन (एम डी) पावडर किंमत अंदाजे ७२,७८० रु, चार इलेक्ट्रॉनिक वजन काटा किंमत अंदाजे १६०० रु, तसेच ३० झिपलॉक ३० प्लास्टिक पन्नी किंमत १०० रु असा एकूण ७४३८० रु चा मुद्देमाल मिळून आल्याने सरतर्फे कृष्णा दराडे पोलीस उपनिरीक्षक यांच्या लेखी रिपोर्ट वरून पोस्ट रामनगर येथे अप क्र ११६७/२०२६ कलम – ८ (क), २२(ब) अन्वये गुन्हा दाखल करून तपासात आहे. पुढील तपास पो उपनि सौरभ साळुंखे पो स्टे रामनगर करीत आहेत. वरील कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक श्री आयुष नोपानी, मा. अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी कुमार सुशांत व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रमोद चौगुले यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके, सहा. पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे, सहा. पोलीस निरीक्षक हनुमान उगले, पोलीस उप निरीक्षक कृष्णा दराडे, परि पोउपनि सचिन पांढरे, पोलीस अंमलदार बाबा नैताम, आनंद खरात, प्रकाश बलकी, रामप्रसाद नैताम, रविकुमार ढेंगळे, जितेंद्र आकरे, मनिषा मोरे, प्रकाश मडावी, पंकज ठोंबरे, संदिप गेडाम, सुरेश कोरवार, पंकज पोंदे, सुरज शेडमाके, ब्ल्युटी साखरे यांनी केली आहे.