Sunday, September 13, 2026
spot_img
HomeEducationजनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर या शाळेत पंडित जवाहरलाल नेहरू जयंती साजरी,...

जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर या शाळेत पंडित जवाहरलाल नेहरू जयंती साजरी, श्री. कुरुमदास काळे गुरुजी यांच्यातर्फे विद्यार्थ्यांना स्कूलबॅग वाटप

जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर या शाळेत पंडित जवाहरलाल नेहरू जयंती साजरी, श्री. कुरुमदास काळे गुरुजी यांच्यातर्फे विद्यार्थ्यांना स्कूलबॅग वाटप

Jyotsna Wankhede:
जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर या शाळेत पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती बालक दिन म्हणून साजरी करण्यात आली. मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष बी. बी. भगत मुख्याध्यापक, प्रमुख पाहुणे पि. यू जरीले,  कुरुमदास काळे गुरुजी, आर. के. वानखेडे यांची उपस्थिती होती. प्रथमता: मंचावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या फोटोला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
शाळेच्या विद्यार्थिनी त्रिशाली महानंद, रूपाली निमकर, राशी वेले यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जीवनपटावर आपली भाषणे दिली.
बालक दिनाचे औचित्य साधून कुरुमदास काळे गुरुजी यांच्यातर्फे वर्ग पाचवीच्या विद्यार्थ्यांना स्कूलबॅगचे वितरण करण्यात आले.
प्रमुख पाहुणे पि. यू. जरीले यांनी सांगितले की, शिक्षणाशिवाय पर्याय नाही, आपले भविष्य उज्वल करण्यासाठी शिक्षण घेणे आवश्यक आहे.
अध्यक्षीय भाषण बी. बी. भगत मुख्याध्यापक यांनी केले. प्रास्ताविक आर. के. वानखेडे संचालन व आभार प्रदर्शन एस. एन.  लोधे मॅडम यांनी केले.
कार्यक्रमात आर. बी. अलाम, यु. के. रांगणकर,  गणेश चंदावार, जगदीश कांबळे, वामन बोबडे, वाल्मीक खोंडे, इंद्रभान अडबाले तसेच विद्यार्थी वर्ग उपस्थित होता. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना चॉकलेट व केळीचे वाटप करण्यात आले.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page