Tuesday, October 13, 2026
spot_img
HomeGadchandur*पोलीस स्टेशन गडचांदूर येथील डी.बी.पथकाची सिनेस्टाईल वाहनाचा पाठलाग करून ३७ गोवंशीय जातीचे...

*पोलीस स्टेशन गडचांदूर येथील डी.बी.पथकाची सिनेस्टाईल वाहनाचा पाठलाग करून ३७ गोवंशीय जातीचे जनावरांची सुटका तीन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल एका आरोपीस अटक*

*पोलीस स्टेशन गडचांदूर येथील डी.बी.पथकाची सिनेस्टाईल वाहनाचा पाठलाग करून ३७ गोवंशीय जातीचे जनावरांची सुटका तीन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल एका आरोपीस अटक*

*ज्योत्स्ना वानखेडे*:
दि. १२/१०/२०२६ रोजी मुखबिरद्वारे खात्रीशीर खबर मिळाली की, मौजा भोयगाव मार्गाने एक कथ्था रंगाचा अशोक लेलँड कंपनीचा ट्रक क्रमांक एम.एच.३४ ऐ.व्ही.२३१२ मध्ये गोवंश जातीचे जनावरे कत्तली करिता तेलंगणा राज्यात घेऊन जाणार आहे. अश्या माहिती वरून मौजा भोयगाव येथे नाकाबंदी केली असता चंद्रपूर ते भोयगाव मार्गे एक कथ्था रंगाचा अशोक लेलँड कंपनीचा ट्रक येतानी दिसला सदर ट्रक नाकाबंदी दरम्यान हाताचा ईशारा दाखवून थांबण्याचा ईशारा केला असता सदर चालकाने ट्रक न थांबता भरधाव वेगाने निघून गेला सदर माहिती वरिष्ठांना देऊन सदर ट्रकचा पाठलाग केला असता सदरचे ट्रक मौजा गडचांदूर-कोरपना मार्गे तेलंगणा राज्यकडे जात असताना मौजा पारडी येथे नाकाबंदी दरम्यान पोलीसांना पाहून सदर ट्रक चालक हा आपल्या ताब्यातील ट्रक दुर थांबवून सोडून पळून जात असताना पो.स्टॉफ नी सदर ट्रकचा पाठलाग करून चालकास पकडले.
सदर मिळून आलेला ट्रक ची पंचासमक्ष पो.स्टॉफच्या मदतीने पाहणी केली असता सदर ट्रकमधे एकुण ३७ नग गोवंश जातीचे बैल व गायी एकुण किंमत ७,४०,०००/- रु. २) जनावरे वाहतूक करण्या करीता वापरलेला अशोक लेलँड कंपनीचा १४ चाकी ट्रक क्रमांक एम.एच.३४ ऐ.व्ही.२३१२ किं.अं. १५,००,०००/-रु. ३) एक गुन्ह्यात वापरलेला काळ्या रंगाचा एच.एम.डी.कंपनीचा मोबाईल किं.अं. १०००/-रु. असा एकुण २२,४१,०००/-रु. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. असून सदर वाहना मधील गोवंशीय जनावरांना योग्य व्यवस्थापनार्थ गोरक्षण प्यार फाऊंडेशन पडोली ,चंद्रपूर येथे दाखल करण्यात आलेले आहे.यातील आरोपी विरुध्द कलम ११(१)(घ),(ड)(च)(ज),प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६०,सहकलम ५(ए),५(बी),९,११,महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम १९७६सह कलम ३२५,२८१,४९ भा.न्या.स. सहकलम १८४ मो.वा.का. अन्वये गुन्हा नोंद करून एक आरोपीस अटक करण्यात आले आहे व गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक आयुष नोपानी साहेब चंद्रपूर, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे सा.चंद्रपूर, उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र जाधव सा.गडचांदूर यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन गडचांदूर चे ठाणेदार पोनि. प्रमोद बानबले, पोउपनि/पंकज हेकाड, पोहवा शितल बोरकर,नापोअं बलवंत शर्मा,पो.अं.साईनाथ उपरे,पोअ/सुरज ढोले,पोअ/प्रकाश बाजगीर, पो.अं.मनोहर जाधव,पोअ/श्रीनिवास सोडणर यांनी सदरची कार्यवाही केली आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page