*कर्मवीर विद्यालय येनबोडी येथे RECAP 4NDC प्रकल्पांतर्गत पर्यावरण जनजागृती व स्पर्धा संपन्न*
*Jyotsna Wankhede*:
कर्मवीर विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, येनबोडी येथे भारतीय वानिकी अनुसंधान एवं शिक्षा परिषद, देहरादून व अन्नपूर्णा सेवाभावी संस्था, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने RECAP 4 NDC प्रकल्पांतर्गत पर्यावरण जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन दि. ८ ऑक्टोबर २०२६ रोजी करण्यात आले. या कार्यक्रमांमध्ये पर्यावरणाची होणारी ह ानी वेळेवरच थांबवणे याच काळाची गरज आहे यासंदर्भात शाळेच्या मुलांना खूप चांगल्या पद्धतीने माहिती देण्यात आली . त्याचबरोबर स्वस्थ वन समृद्ध भारत व लोकसहभाग त्याचबरोबर हिरवे गाव समृद्ध गाव या विषयावर चित्रकला स्पर्धा घेण्यात आली
या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून भारतीय वानिकी अनुसंधान एवं शिक्षा परिषद देहरादून या ऑर्गनायझेशन चे समुपदेशक *श्री. नरेश पालसिंग नयन*, अन्नपूर्णा सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष *श्री. प्रमोद सावंत*, प्रशिक्षक *सौ. वैशाली घोरपडे, सौ. छाया गायकवाड*, समन्वयक *श्री. सुरज मस्के, श्री. मयुर सूर्यवंशी* व सदस्य *श्री. रामचंद्र सावंत* हे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका *सौ. वासाडे मॅडम* होत्या. यावेळी उपमुख्याध्यापिका *सौ. पडोळे मॅडम* व पर्यवेक्षक *श्री. Ghugal सर* हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या अंतर्गत शाळेत चित्रकला व निबंध स्पर्धा घेण्यात आली.
*चित्रकला स्पर्धेत* कु. भाग्यश्री वसंत बुरनवार हिने प्रथम, कु. सृष्टी राजेंद्र सरवर हिने द्वितीय तर कु. लावण्या अतुल खोब्रागडे हिने तृतीय क्रमांक पटकाविला.
*निबंध स्पर्धेत* कु. धनश्री अण्णाजी येरगुडे हिने प्रथम, कु. भूमी राजेंद्र सरवर हिने द्वितीय तर कु. सावी प्रशांत ढोंगे हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला.
सर्व विजेत्या विद्यार्थिनींचे मान्यवरांच्या हस्ते अभिनंदन करण्यात आले.