Thursday, April 16, 2026
Homeबल्लारपूरशास्त्रीय उपशास्त्रीय तथा सुगम गायनाची बहारदार संगीत मैफिल संपन्न...
spot_img

शास्त्रीय उपशास्त्रीय तथा सुगम गायनाची बहारदार संगीत मैफिल संपन्न…

शास्त्रीय उपशास्त्रीय तथा सुगम गायनाची बहारदार संगीत मैफिल  संपन्न…

श्रेयश वानखेडे: 
गुरुकृपा संगीत विद्यालय, बल्लारपूर चे  संचालक श्री. दिलीप दातारकर यांचे वतीने शास्त्रीय, उपशास्त्रीय तथा सुगम गायनाची बहारदार  संगीत मैफिल संपन्न झाली.
कार्यक्रमाचे सुरुवातीस श्रीमान राजेश वाळके यांनी राग मधुवंती  तीन ताल  मधील पारंपरिक बंदिश गाऊन उपस्थितांची मने जिंकली.  तबला साथ सेवानिवृत्त उप पोलीस अधीक्षक श्रीमान श्रीराम तोडासे  चंद्रपूर  व हार्मोनियम साथ श्रीमान दिलीप दातारकर  यांनी उत्कृष्ठ साथ केली.
चंद्रपूर येथील श्रीमान मोरेश्वर मडावी यांनी राग  पुरियाधनश्री विलंबित रूपक, मध्य लय तीन ताल  मधील पायलिया झन कार ही  पारंपरिक बंदिश सादर केली व ताल दिप चं दी मधील ठुमरी गाऊन आपली बहारदार गायन सेवा देऊन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. चंद्रपूर येथील उत्कृष्ठ  तबला वादक श्रीमान सतीश कवरासे यांनी केली व हार्मोनियम साथ श्रीमान दिलीप दातारकर यांनी केली.
बल्लारपूर येथील सुपरिचित गायक श्रीमान रविकांत राठोड यांनी आपल्या भक्तीगीत गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले त्यांना तबला साथ श्रीमान शेंद्रे सर  यांनी केली.  सौ. रजनी वाळके यांनी पायोजी मैने राम रतन धन पायो हे  भक्ती गीत आपल्या सुमधुर आवाजात सादर केले. यावेळी डॉक्टर शिंदे यांनी वेळात वेळ काढून आपली सेवा दिली.तसेच श्रीमान सुधीर जी नाकाडे यांनी आपली  उत्कृष्ठ भजन सेवा दिली.
चंद्रपूर येथील  श्री सतीश दादा कवरासे यांचे पुत्र  अथरव यांनी बहारदार गवळण सादर केली तथा अर्नव यांनी उत्कृष्ठ अशी तबला साथ दिली.  कार्यक्रमाचे शेवटी सौ.भाग्यश्री कंडारकर यांनी आपल्या सुमधुर आवाजातून कजरी/ ठुमरी व अवघा रंग एक झाला ह्या भैरवी ने  कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी उत्कृष्ठ तबला वादक  श्रीमान सतीश कवरासे तबला साथ केली  तथा हार्मोनियम ची साथ श्री दिलीप दातारकर बल्लारपूर  यांनी केली.
श्रीमान माणिकराव दुधलकर सर  यांनी   जीवना मध्ये संगीताला अनन्य साधारण  असे महत्त्व असल्याचे विशद केले. गुरुकृपा संगीत विद्यालयाचे संचालक श्री दिलीप दातारकर यांनी  सर्व उपस्थितांचे आभार मानले.
यावेळी मोठ्या संख्येने संगीत कलाकार व रसिक गन उपस्थित होते.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page