Sunday, September 13, 2026
spot_img
HomeEducationआदिवासी उमेदवारांकरीता नि:शुल्क स्पर्धा परिक्षा पूर्व प्रशिक्षण

आदिवासी उमेदवारांकरीता नि:शुल्क स्पर्धा परिक्षा पूर्व प्रशिक्षण

आदिवासी उमेदवारांकरीता नि:शुल्क स्पर्धा परिक्षा पूर्व प्रशिक्षण

Ø 26 नोव्हेंबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

चंद्रपूर( जीमाका) :   आदिवासी उमेदवारांकरीता वर्ग-3 व  वर्ग-4 पदांकरीता घेतल्या जाणाऱ्या स्पर्धात्मक परिक्षेची तयारी करून घेण्याकरीता आदिवासी उमेदवारांकरीता कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन  केंद्र, चंद्रपूर येथे स्पर्धा परिक्षा पूर्व प्रशिक्षण दिनांक 1 डिसेंबर 2024 ते 15 मार्च, 2025 पर्यंत राबविण्यात येणार आहे. प्रशिक्षण कालावधीत उमेदवारांना दरमहा 1 हजार रुपये विद्यावेतन देय राहील.  या प्रशिक्षण कालावधीत खालील अटीची पुर्तता करणाऱ्या अनुसूचित जमातीच्या एसटी प्रवर्गातील आदिवासी उमेदवारांनी त्यांचे अर्ज 26 नोव्हेंबर 2024 पर्यंत सादर करावेत.
            अर्जामध्ये स्वत:चे पूर्ण नाव, संपूर्ण पत्ता, मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक, जन्मतारीख, शैक्षणिक पात्रता, प्रवर्ग (जात), जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन  केंद, चंद्रपूर यांचा नोंदणी क्रमांक इत्यादी बाबींचा उल्लेख करावा व सोबत आवश्यक कागदपत्रे जोडावीत. अर्ज करण्यांकरीता (Employment Card) असणे आवश्यक आहे.  उमेदवारांनी आपले अर्ज जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन  केंद, प्रशासकीय भवन, पहिला माळा, हॉल क्र.19, चंद्रपूर येथे 26 नोव्हेंबर 2024 पर्यंत सादर करावे. तसेच मुळ कागदपत्रासह 27 नोव्हेंब रोजी  सकाळी 11 वाजता वरील स्थळी मुलाखतीकरीता उपस्थित राहावे. निवड यादी दुसऱ्या दिवशी सायंकाळपर्यंत प्रसिध्द करण्यात येईल.
          प्रशिक्षणाच्या अटी : 1) उमेदवार अनु.जमाती एसटी (आदिवासी ) प्रवर्गातील असावा. 2) उमेदवाराचे किमान वय 18 ते 38 चे दरम्यान असावे. 3) उमेदवार किमान एच.एच.एस.सी परीक्षा उर्त्तीण असावा. 4) उमेदवारांचे नांव जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन  केंद, चंद्रपूर  येथे नोंदणी केलेली असावे.
        आवश्यक कागदपत्रे : 1) शाळा सोडल्याचा दाखला. 2) जातीचा दाखला किंवा जात  वैधता प्रमाणपत्र. 3) मार्कशिट्स एसएसीसी/ एचएचएससी/पदवी 4) आधार कार्ड. 5) जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन  केंद, चंद्रपूर या कार्यालयाचे नोंदणी कार्ड.

 

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page