Thursday, January 22, 2026
HomeSpardhaजनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूरचा समूह नृत्य स्पर्धेत द्वितीय क्रमांक
spot_img

जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूरचा समूह नृत्य स्पर्धेत द्वितीय क्रमांक

जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूरचा समूह नृत्य स्पर्धेत द्वितीय क्रमांक

श्रेयश वानखेडे:
रोटरी क्लब बल्लारपूर तर्फे भरविण्यात आलेल्या मेला उत्सव 2024 मध्ये समूह नृत्य स्पर्धेत जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर च्या चमूने द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे.
रे रेला रे रेला….. या गीतामधून भारत माता की जय….. हा संदेश समूह नृत्यातून पोहोचवण्यात आला. यामध्ये कु. रूपाली मनोज निमकर, कु. त्रिशाली पप्पू महानंद, कु. राशी राहुल वेले, कु. वैशाली पप्पू महानंद, कु. राधिका किशोर मांदाळे, कु. अनुष्का सोनू दुर्गे, कु. शिक्षा चंदू रामटेके, कु. अभिशा राकेश टेंभरे, अथर्व नितेश हिकरे, नक्ष गणेश दुर्गे आणि  सोहम अमरदीप दुर्गे या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
याबाबत दिनांक: 16/01/2024 ला शाळेमध्ये छोटेखानी कार्यक्रम घेण्यात आला आणि विद्यार्थ्यांचा गौरव करून, बक्षीस प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बी. बी. भगत (मुख्याध्यापक), प्रमुख पाहुणे एम. डी. टोंगे (माजी मुख्याध्यापक),  प्रमुख उपस्थिती आर. बी. अलाम, यु. के. रांगणकर यांची होती.
मंचावर उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रास्ताविक आर. के. वानखेडे, संचालन एस. एम. चव्हाण, आभार प्रदर्शन एस. एन. लोधे मॅडम यांनी केले.
कार्यक्रमात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी चंदावार बाबू, जगदीश कांबळे, वामनराव बोबडे, वाल्मीक खोंडे साहित्य विद्यार्थी वृंद उपस्थित होते.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page