Monday, January 19, 2026
HomeEducationजनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर येथे दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप
spot_img

जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर येथे दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर येथे दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

श्रेयश वानखेडे:
जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर येथे दिनांक: 28/02/ 2024 रोजी  दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बी. बी. भगत (मुख्याध्यापक), प्रमुख पाहुणे यु. के. रांगणकर (वर्गशिक्षक दहावी), एम. डी. टोंगे (वर्गशिक्षक नववी), प्रमुख उपस्थिती आर. के. वानखेडे, आर. बी. अलाम  यांची होती.
प्रथमता: मंचावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या फोटोला मार्ल्यापण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. मंचावर उपस्थितांचे शब्द सुमनाने स्वागत करण्यात आले.
प्रास्ताविकात शाळेचे शिक्षक आर. बी. अलाम यांनी दहावी बोर्डाच्या परीक्षेबाबत विद्यार्थ्यांना सूचना बाबत मार्गदर्शन केले. दहावीचे वर्गशिक्षक यु. के. रांगणकर सर यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांना स्वतःची प्रगती करण्यासाठी विज्ञानाची कास धरण्याची आवश्यकता आहे. अध्यक्षीय भाषण करताना बी. बी. भगत मुख्याध्यापक यांनी सांगितले की, शाळेमध्ये शिकवितांना शिक्षक विद्यार्थ्यांचे पितृत्व आणि मातृत्व स्वीकारतो. व त्यास योग्य घडणीतून वळण लावण्यासाठी मदत करतो. सुज्ञ नागरिक बनण्यासाठी विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याची आवश्यकता आहे.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित निबंध स्पर्धा,  लक्ष ग्रुप बल्लारपूर तर्फे घेण्यात आलेली सामान्य ज्ञान स्पर्धा, शालेय सांस्कृतिक कार्यक्रम, एलिमेंट्री परीक्षा, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन पटावर आधारित निबंध स्पर्धा आदी बाबत प्रमाणपत्र मंचावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
दहावीच्या विद्यार्थ्यांना कंपास वाटप करण्यात आले.
संचालन एस. एन. लोधे मॅडम व आभार प्रदर्शन एस. एम. चव्हाण यांनी केले.कार्यक्रमात आर. के. वानखेडे, एम. डी. टोंगे आदी शिक्षक, वामनभाऊ बोबडे, गणेश चंदावार (बाबू), जगदीश कांबळे, इंद्रभान अडबाले आदी  शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी वृंद उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना अल्पोपहार देऊन  सांगता करण्यात आली.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page