Thursday, January 22, 2026
Homeबल्लारपूरउपविभागीय अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने आम आदमी पार्टी, वन विभाग व पेपर मील प्रशासन...
spot_img

उपविभागीय अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने आम आदमी पार्टी, वन विभाग व पेपर मील प्रशासन यांच्यात बैठक

उपविभागीय अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने आम आदमी पार्टी, वन विभाग व पेपर मील प्रशासन यांच्यात बैठक

श्रेयश वानखेडे:
सोमवारी दि. 18 मार्च 2024 शहरातील दिनदयाल वार्डातील न्यु काॅलनी परिसरातील पेपर मीलच्या लाकूड स्टॉक यार्ड मुळे शहरात वन्य प्राण्यांची दहशत, पेपरमील मुळे होणारे वायु व जलप्रदूषण,  पेपरमील च्या ट्रकांमुळे ट्राफिक समस्या, सीएसआर फंड चा जनहितासाठी उपयोग अश्या अनेक जनहिताच्या मुद्द्यांना घेऊन आम आदमी पक्षाने पेपरमील प्रशासनासोबत बैठकीची मागणी केली होती. यानंतर उपविभागीय अधिकारी यांच्या मध्यस्थीने त्यांच्या अनुपस्थितीत नायब तहसीलदार यांनी हि बैठक घेतली. या बैठकीत पेपरमील चे दोन अधिकारी व वनविभागांचे अधिकारी यांच्यासह आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष रविभाऊ पुप्पलवार,  जिल्हा उपाध्यक्ष प्रा. नागेश्वर गंडलेवार, संघठन मंत्री भिवराज सोनी, कोषाध्यक्ष सरफराज भाई, शहर उपाध्यक्ष गणेश सिलगमवार व अफजल आली, सचिव ज्योतिताई बाबरे, संगठन मंत्री रोहित जंगमवार,  प्रवक्ता आसिफ हुसेन शेख, युथ अध्यक्ष सागर कांबळे, महिला उपाध्यक्ष सलमा सिद्दीकी, मनीषा अकोले, गणेश अकोले आणि इत्यादी उपस्थित होते.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page