Wednesday, January 14, 2026
Homeबल्लारपूरशहरात इष्टदेव झूलेलाल महाराज प्रकट दिन उत्साहात साजरा
spot_img

शहरात इष्टदेव झूलेलाल महाराज प्रकट दिन उत्साहात साजरा

शहरात इष्टदेव झूलेलाल महाराज प्रकट दिन उत्साहात साजरा 

श्रेयश वानखेडे:
 पूज्य सिंधी पंचायत बल्लारपूर यांच्या वतीने  इष्टदेव झूलेलाल महाराज यांचा प्रकट दिन तसेच नव वर्ष चेट्री चंड १० एप्रील बूधवार रोजी उत्सवात साजरा करण्यात आला
         यावेळी गोधडीवाला धाम येथे इष्टदेव झूलेलाल महाराज यांचा प्रतिमेची विधीवत पूजा व आरती करण्यात आली. या निमित्त शहरातून मोटार सायकल रॅली काढण्यात आली. गोधडीवाला धाम येथून सुरू होऊन पेपर मिल तीन एक्का गेट, वापस मुख्य मार्गाने नविन बस स्टँड, जूना बस स्टँड ते फॉरेस्ट एन्ट्रीगेट  परत जूना नगर परिषद ते गोल पुलिया होऊन वस्ती विभागातील सिंधी गुरुद्वारा येथे समापन झाले.
दुपारी गोधडीवाला धाम येथे लंगर चे आयोजन करण्यात आले होते. तसेच सायंकाळी ५ वाजता सिंधी गुरुद्वारा येथून मिरवणूक काढून गणपती घाट येथे ज्योती विसर्जन करण्यात आले.
      याप्रसंगी पूज्य सिंधी पंचायत चे प्रताप मूलचंदानी, चंद्रकुमार लालवानी, चंद्रभान आसवानी, टहलराम मंघानी, रामकुमार मंघानी, रवि लालवानी, दौलत लालवानी, सूरज लालवानी, गोविंदराम आहूजा, जयकुमार तिलोकानी, विक्की आर. लालवानी, पूनम मंघानी, राजेश तिलोकानी, बल्लू गिदवानी, सुरेश गिदवानी, दिलीप मूलचंदानी, विक्की डी. लालवानी, घनश्याम मूलचंदानी, सुनील मूलचंदानी, हरीश कुकरेजा, कमल गिदवानी, नरेंद्र तिलोकानी, दिनेश आसवानी,पंकज गिदवानी, संदीप गणवानी, संजय कुकरेजा, नरेश गिदवानी, मोहन गिदवानी, नितेश गिदवानी, हेमंत गिदवानी, उज्जवल नथानी, अर्जुनदास नथानी, मुरली मुलानी सह सिंधी समाज बांधव, महिला मोठ्या संख्येत होते.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page