सुधीर भाऊ मुनगंटीवार यांना भरघोस मताने विजयी करा
आपल्या गाव व शहराच्या विकासासोबतच शिक्षण, आरोग्य व रोजगार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या उमेदवाराला म्हणजे श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचा उमेदवार म्हणून निवडून आणणे हे सुजाण मतदाराचे कर्तव्य आहे.
मागील तीस वर्षात चंद्रपूर जिल्ह्याचा कायापालट करून चंद्रपूरकरांसाठी अभिमानाच जिल्हा म्हणून या जिल्ह्यात ताडोबा पर्यटन स्थळाचा विकास , बांबू संशोधन केंद्र व प्रशिक्षण केंद्र , वन अकॅडमी, चंद्रपूरकरांसाठी पर्यटनासाठी मौलाना आझाद गार्डनचे सौंदर्यीकरण , डॉक्टर अब्दुल कलाम गार्डन, बॉटनिकल गार्डन , बटरफ्लाय गार्डन तसेच चंद्रपूर शहरातील व जिल्ह्यातील अनेक ठिकाणी व्यायाम करण्यासाठी ओपन जिम, चंद्रपूर जिल्ह्यातील क्रीडास्थानांचा विकास, विसापूर येथे आंतरराष्ट्रीय स्तरांचा स्टेडियम देशातील सर्वोत्तम सैनिक शाळा , मेडिकल कॉलेज , टाटा कॅन्सर हॉस्पिटल, बाबा आमटे अभ्यासिका, गोंडवाना विद्यापीठ, तसेच गरजूंना शिलाई मशीन, बांधकाम साहित्याचे वाटप , अमृत जल योजना, तसेच रस्त्यांचे व चंद्रपूर शहरातील सौंदर्यकरणाचे कार्य असे एक नाही अनेक कार्य सुधीर भाऊंच्या कार्यकाळात चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासासाठी करण्यात आले आहे. आपण सर्वांनी सुधीर भाऊंना परत आपल्या जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्याकरिता लोकसभा निवडणुकीत चंद्रपूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याकरिता भरघोस मतांनी निवडून आणावे व चंद्रपूर लोकसभा क्षेत्र हे महाराष्ट्रातच नाही तर देशात ओळखला जावा असे अद्वितीय कार्य सुधीरभाऊ कडून व्हावे अशी अपेक्षा आपण करूया.
एक मतदार
विवेक आंबेकर चंद्रपूर.