बल्लारपूर शहरातील सुभाष वार्डात दुर्गामाता मूर्तीचे अभिषेक
सलग पाच दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
श्रेयश वानखेडे:
बल्लारपूर शहरातील सुभाष वार्ड, जोकू नाला परिसरात दुर्गा माता मूर्ती चे अभिषेक मोठ्या थाटामाटात करण्यात आला.
सलग पाच दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक 13 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजल्यापासून वेदी, मंडप बांधणी, पुजा कलश प्रतिष्ठापना व मिरवणूक यासह पाच दिवसीय धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 14 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजल्यापासून अन्नाधिवास, जलधिवास, पुष्पाधिवास, फलाधिवास, शयनाधिवास आयोजित करण्यात आला आहे. 15 एप्रिल रोजी माता दुर्गामूर्तीच्या जीवन अभिषेक व मंदिराचे उद्घाटन करण्यात आले. 16 एप्रिल रोजी माता भक्तांसाठी भजन संध्याचे आयोजन करण्यात आले होते. व 17 रोजी सायंकाळी 7 ते 10 या वेळेत मातेच्या भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
श्री दुर्गा माता मंदिर समितीचे अध्यक्ष शिवचंद द्विवेदी यांनी माँ दुर्गामूर्तीच्या अभिषेक आणि मंदिराच्या उद्घाटनासाठी केलेल्या सहकार्याबद्दल सर्व देवीच्या भक्तांचे आभार मानले.