Wednesday, January 14, 2026
HomeCrimeउत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक, दुय्यम निरीक्षक व कार्यालय अधीक्षक एसीबी चा जाळ्यात
spot_img

उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक, दुय्यम निरीक्षक व कार्यालय अधीक्षक एसीबी चा जाळ्यात

उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक, दुय्यम निरीक्षक व कार्यालय अधीक्षक एसीबी चा जाळ्यात 

श्रेयश वानखेडे:
 7 मे ला चंद्रपुरातील उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय पाटील, दुय्यम निरीक्षक चेतन खारोडे व कार्यालय अधीक्षक अभय खताळ यांना 1 लाखांची लाच स्वीकारल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.
       फिर्यादी हे घुग्गुस येथील रहिवासी असून  त्यांनी वर्ष 2023 नोव्हेंबर मध्ये नवीन बिअर शॉपच्या परवान्यासाठी अर्ज केला होता, मात्र त्यावेळी त्यांना अधीक्षक संजय पाटील व कार्यालय अधीक्षक अभय खताळ यांनी फिर्यादीला आज या उद्या या म्हणत त्यांना नाहक त्रास देत टाळाटाळ केली.काही दिवसांनी दुय्यम निरीक्षक चेतन खारोडे यांनी मी तुमचा बिअर शोपीचा परवाना मंजूर करून देतो मात्र त्यासाठी अधीक्षक व स्वतःसाठी 1 लाख रुपयांची मागणी केली. फिर्यादी यांची पैसे देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी 25 एप्रिलला चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला तक्रार दिली. मध्यंतरी फिर्यादी यांना 1 लाख रुपयांची लाच मागितली, 7 मे रोजी उत्पादन शुल्क विभाग चंद्रपूर कार्यालयात कार्यालय अधीक्षक अभय खताळ यांनी खारोडे यांच्या सांगण्यावरून 1 लाख रुपयांची रक्कम स्वीकारली, त्यानंतर चेतन खारोडे यांनी पैसे मिळल्याबाबत अधीक्षक पाटील यांना मोबाईल द्वारे सूचना दिली, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने खात्री पटवित, 1 लाख रुपये स्वीकारताना अभय खताळ यांना रंगेहात अटक केली.
       सदर लाच प्रकरणी अधीक्षक संजय पाटील, अभय खताळ व चेतन खारोडे यांच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
       सदरचा यशस्वी सापळा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक राहुल माकनिकर, अप्पर पोलीस अधीक्षक संजय पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक मंजुषा भोसले यांच्या नेतृत्वात पोलीस कर्मचारी नरेश नन्नावरे, हिवराज नेवारे, संदेश वाघमारे, राकेश जांभुळकर, प्रदीप ताडाम, पुष्पा काचोळे व सतीश सिडाम यांनी केला.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page