श्रेयश वानखेडे:
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा तालुक्यातून दुसरा पुरस्कार प्राप्त शाळा स्व. गोपाळराव वानखेडे विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय नांदगाव पोडे यांनी पुरस्काराला साजेशी कामगिरी करत यावर्षी विज्ञान शाखेचा १०० टक्के तर कला शाखेचा ९६.८९ टक्के निकाल लावत तालुक्यात उत्तम व भरीव कामगिरी केली. या बद्दल शाळेचे प्राचार्य नरेंद्र बोबडे व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे परिसरात कौतुक होत आहे.
स्व. गोपाळराव वानखेडे विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय मधून या वर्षी १२ वी चे विज्ञान शाखेचे एकूण ७९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ७९ ही विद्यार्थी उत्तीर्ण होवून शाळेचा निकाल १०० टक्के लावण्याची किमया त्यांनी साधली तर कला शाखेतून ६४ पैकी ६२ विद्यार्थी उत्तीर्ण होत ९६.८७ टक्के निकाल लावला यामुळे प्राचार्य बोबडे यांच्या नियोजन व शिस्तीचे परिसरात कौतुक होत आहे.
शाळेमधून विज्ञान शाखेत कारुण्य भटवलकर प्रथम येत ७८.६७ टक्के, द्वितीय मोहित भोयर ७७.६७ तर वेणुका देवांगन या विद्यार्थिनीने ७७.१७ टक्के घेत तिसरा क्रमांक पटकाविला त्याच प्रमाणे कला शाखेत समीर ढोबळे व गौरव गाताडे ६७.१७ सारखे टक्के घेत प्रथम येण्याचा व अक्षया बुटकुरी ६४.५० टक्के घेत द्वितीय येण्याचा मान पटकविला या सर्व विद्यार्थ्याचे शाळेचे प्राचार्य व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी स्वगृही जाऊन त्यांचा सत्कार केला व भविष्यातील शिक्षणासाठी मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.