Thursday, March 12, 2026
HomeFraudब्रम्हपुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बांधकामात कोट्यवधींचा घोटाळा
spot_img

ब्रम्हपुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बांधकामात कोट्यवधींचा घोटाळा

ब्रम्हपुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बांधकामात कोट्यवधींचा घोटाळा

गैरव्यवहाराचा पर्दाफाश होणार, चौकशीचे आदेश

श्रेयश वानखेडे:
ब्रम्हपुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बांधकामात झालेल्या मोठ्या गैरव्यवहाराचे प्रकरण उघडकीस येणार असून, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, चंद्रपूर यांनी सहायक निबंधक, सहकारी संस्था, ब्रम्हपुरी यांना तातडीने सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
राहुल श्रीराम भोयर, संपादक, ब्रम्हपुरी दर्पण यांनी आपल्या निवेदनात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागेवर नगर परिषदेकडून ५९ गाळ्यांचे बांधकाम करण्याची परवानगी मिळाल्याचे सांगितले आहे. परंतु, प्रत्यक्षात ७७ गाळ्यांचे बांधकाम करण्यात आले असून, प्रत्येक गाळा दीर्घ मुदतीसाठी ७.५० लाख ते ८ लाख रुपयांत नगदी एक रक्कमी किरायाने देण्यात आले आहेत. या व्यवहारात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार करून शासनाची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
यापूर्वीही, दिनांक २६ फेब्रुवारी २०२४ रोजीच्या पत्रानुसार, या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु, कोणतेही चौकशीचे अहवाल प्राप्त न झाल्याने, जिल्हा उपनिबंधकांनी पुनःश्च स्मरणपत्र पाठवून तातडीने चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
राहुल भोयर यांच्या निवेदना नुसार सर्व बाबींची मुद्देसूद चौकशी करून आपला सुस्पष्ट अभिप्रायासह अहवाल सादर करावा, असे आदेश जिल्हा उपनिबंधकांनी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था ब्रम्हपुरी यांना दिले आहे. सदर गैरव्यवहारामुळे शासनाच्या निधीचा दुरुपयोग झाला असून, या प्रकरणात मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे. चौकशी अंती दोषींवर कठोर कारवाई होऊ शकते.
ब्रम्हपुरी कृषी उत्पन्न बाजार समितीतील हा प्रकार केवळ आर्थिक अपहार नसून, शासकीय यंत्रणेमधील विश्वासार्हतेवर देखील प्रश्नचिन्ह उभे करतो. या संदर्भात सखोल चौकशी करून संबंधित दोषींवर कठोर कारवाई करणे अत्यंत गरजेचे आहे. यामुळे भविष्यात अशा प्रकारच्या अपहारांना आळा बसण्यास मदत होईल.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page