चंद्रपूर जिल्ह्यात व्यावसायिकाकडे घरगुती सिलेंडर चा वापर
प्रशासन डोळे बंद करून, गंमत पाहत आहे
चंद्रपूर जिल्ह्यात छोट्या मोठ्या व्यवसायिकाकडे घरगुती सिलेंडरचा वापर होत असल्याची चर्चा सुरू आहे.
व्यावसायिक सिलेंडर भेटेनासे झाल्यामुळे, असा उपक्रम यांनी सुरू केला असल्याचे चित्र सर्व तालुक्यात दिसत असल्याची चर्चा सुरू आहे.
असेही लक्षात आले की, कुटुंबाला दोन सिलेंडर मिळतात. त्यांना एकच सिलेंडर लहान कुटुंब असल्यामुळे दोन महिने चालते त्यापैकी ते एक सिलेंडर या व्यापाऱ्याला विकतात व आपली रोजी रोटी शेकतात.
प्रशासन मात्र डोळे बंद करून गंमत पाहत असल्याची चर्चा सुरू आहे. एकाही व्यावसायिकाकडे त्यांना जाऊन पाहण्यासाठी वेळ नाही असे चित्र सर्वच गल्लीबोळात दिसत असल्याची चर्चा सुरू आहे.