Saturday, April 18, 2026
HomeEducationजनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर येथे पालक शिक्षक समिती गठीत
spot_img

जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर येथे पालक शिक्षक समिती गठीत

जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर येथे पालक शिक्षक समिती गठीत

श्रेयश वानखेडे:
जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर या शाळेत दिनांक: 31/07/2024 रोजी पालक शिक्षक सभा संपन्न होऊन 2024-25 साठी समितीचे गठन करण्यात आले.
प्रथमता: मंचावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या फोटोला मार्ल्यापण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
सत्र 2024-25 साठी पालक शिक्षक समिती कार्यकारिणी याप्रमाणे,
1) श्री. बी. बी. भगत  (मुख्याध्यापक)- अध्यक्ष
2) सौ. लता कवी साठे (पालक प्रतिनिधी)- उपाध्यक्ष
3) श्री. आर. बी. अलाम( शिक्षक प्रतिनिधी)- सचिव
4) सौ. अस्मिता आदेश पेटकर (पालक प्रतिनिधी)- सहसचिव
5) सौ. एस. एन. लोधे (महिला शिक्षक प्रतिनिधी)- सहसचिव
6) कु. राशी राहुल वेले- विद्यार्थी प्रतिनिधी
तसेच प्रत्येक वर्गातील एक वर्ग शिक्षक व विद्यार्थी सदस्य आहेत.
श्री. आर. बी. अलाम यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी शाळा सप्ताह मध्ये तो प्रतिसाद दिला तसा आपल्या जडणघडणीत दिला पाहिजे.
 आपले अध्यक्षीय भाषण करताना श्री. बी. बी. भगत( मुख्याध्यापक) यांनी सांगितले की, आपले आई-वडील जीवाचे रान, त्याग करून आपल्याला शिकवितात त्यांचे फळ त्यांना आपण प्राप्त करून द्या.
 प्रास्ताविक श्री. आर. बी. अलाम, संचालन श्री. आर. के. वानखेडे, आभार श्री. एस. एम. चव्हाण यांनी मानले.
 तसेच सभेत शिक्षक श्री. एम. डी. टोंगे, श्री. यु. के. रांगणकर शिक्षकेतर कर्मचारी श्री. गणेश चंदावर बाबू, श्री. जगदीश कांबळे श्री. वाल्मीक खोंडे, श्री. इंद्रभान अडबाले, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page