Wednesday, February 11, 2026
Homeबल्लारपूरऑटो रिक्षा चालकांच्या मुलाचा मेडिकल कॉलेज मध्ये प्रवेश, नागरिकांनी केला सत्कार
spot_img

ऑटो रिक्षा चालकांच्या मुलाचा मेडिकल कॉलेज मध्ये प्रवेश, नागरिकांनी केला सत्कार

ऑटो रिक्षा चालकांच्या मुलाचा मेडिकल कॉलेज मध्ये प्रवेश, नागरिकांनी केला सत्कार

श्रेयश वानखेडे:
उचित ध्येय गाठण्यासाठी जिद्द महत्त्वाचे असुन त्यासाठी नियमित मेहनतीची गरज असल्याचे डॉ. मनोज ग्रामीण रुग्णालय, बल्लारपूर यांनी सांगितले. तसेच त्यांनी काही सुचना केल्यात. मा.मिलींद प्रकाश दबडे यांचा केंद्रीय कोट्यात नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे. मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला.त्याला 99.903 पर्सेंटाइल मार्क मिळाले.निट मध्ये 603 मार्क असुन राज्यातील जनरल ऱ्यांक 2660 आहे.मिलींद प्रकाश दबडे यांनी केवळ कुठल्याही ट्युशन क्लासेस शिवाय ऑनलाईन अभ्यास केला हे विशेष आहे.त्याबद्दल “मूलनिवासी संघाचे” वतीने त्यांचा रिक्षा चालक मा.प्रकाश दबडे,आई आणि भाऊ  विश्वजीत व परिवाराचे बालाजी वार्ड बल्लारपूर त्यांचे घरी अभिनंदन करण्यात आले. मा.डाॅ.मनोज, डोळ्याचे तज्ञ, मा.जि.के उपरे, माजी मानद सचिव सिडीसिसि बँक, मा.एम.टी. साव, शांताराम वाडगुरे इ.नी सत्कार केला.या प्रसंगी मा.शरिफ हक्क, ताराचंद थुल, दिगंबर झामरे, कमलाकर दबडे उपस्थित होते.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page