Friday, May 1, 2026
HomeEducationशिक्षकांना अशैक्षणिक कामांतून मुक्‍त करा- शिक्षक आमदार सुधाकरराव अडबाले
spot_img

शिक्षकांना अशैक्षणिक कामांतून मुक्‍त करा- शिक्षक आमदार सुधाकरराव अडबाले

शिक्षकांना अशैक्षणिक कामांतून मुक्‍त करा- शिक्षक आमदार सुधाकरराव अडबाले

विभागीय आयुक्त डॉ. बिदरी यांना निवेदन

श्रेयश वानखेडे:

राज्यातील शिक्षकांना अशैक्षणिक कामे दिली जात असल्‍याने राज्‍यातील शिक्षकांत तीव्र असंतोष आहे. त्यामुळे शिक्षकांची अशैक्षणिक कामांतून तात्काळ मुक्तता करावी व शासन निर्णयाची अंमलबजावणी करावी, याबाबत विभागीय आयुक्तांसोबत चर्चा केली.

२३ ऑगस्ट २०२४ च्या शासन निर्णयानुसार शैक्षणिक व अशैक्षणिक कामांच्या वर्गीकरणाबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. या शासन निर्णयानुसार जनगणना, आपत्ती निवारणाची कामे व निवडणुकांची कामे ही कामे वगळता इतर सर्व अशैक्षणिक कामांतुत तात्‍काळ सर्व शिक्षकांची मुक्‍तता करावी व सदर शासन निर्णयाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याबाबत विभागातील सर्व अधिकारी यांना निर्देश द्यावे, याबाबत विभागीय आयुक्त डॉ. विजयालक्ष्मी बिदरी यांना निवेदन दिले.

यावेळी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे नागपूर महानगर कार्यवाह अविनाश बढे यांची उपस्थिती होती.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page