जनता हायस्कूल (डेपो शाखा )बल्लारपूर येथे निबंध स्पर्धा संपन्न

श्रेयश वानखेडे:
जनता हायस्कूल ( डेपो शाखा) बल्लारपूर या शाळेत माहिती अधिकार कायदा 2005 दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्त शाळेत निबंध स्पर्धा घेण्यात आली.
वर्ग 5 ते 6 गटात: ( विषय- अधिनियमाची आवश्यकता, माहितीच्या अधिकाराचे स्वरूप)
शिफा मोहम्मद ह्यात शेख- प्रथम, अवनी आदेश पेटकर- द्वितीय, अनुष्का सोनू दुर्गे- तृतीय
वर्ग 7 ते 8 गटात: ( विषय- फायदे, पार्श्वभूमी, माहिती जाहीर करण्यापासून सूट) राशी राहुल वेले- प्रथम, सिया बाळू देवगडे- द्वितीय, वैशाली पप्पू महानंद-तृतीय
वर्ग 9 ते 10 गटात: ( प्रक्रियेचा आलेख) श्रावणी प्रवीण मते- प्रथम, सुष्मिता विजय उईके- द्वितीय, कार्तिक विनोद सोनुले- तृतीय
या निबंध स्पर्धेत एकूण 22 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. मान. शिक्षण विभाग (माध्यमिक) चंद्रपूर यांच्या आदेशानुसार व मान. बी. बी. भगत मुख्याध्यापक यांच्या सूचनेनुसार निबंध स्पर्धा घेण्यात आली.
निबंध स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आर. के. वानखेडे, एस. एन. लोधे, आर. बी. अलाम, यू. के. रांगणकर यांनी सहकार्य केले. परीक्षकाचे काम एस. एम. चव्हाण यांनी बघितले.