Monday, January 19, 2026
HomeEducationजूनी पेन्शनच्या मागणीसाठी बेमुदत आमरण उपोषण आंदोलनास सक्रीय पाठिंबा.
spot_img

जूनी पेन्शनच्या मागणीसाठी बेमुदत आमरण उपोषण आंदोलनास सक्रीय पाठिंबा.

जूनी पेन्शनच्या मागणीसाठी बेमुदत आमरण उपोषण आंदोलनास सक्रीय  पाठिंबा.

श्रेयश वानखेडे:
1 नोव्हेंबर 2005 पासून सेवेत आलेल्या सर्व शासकीय, निमशासकीय, अनुदानित संस्थेमधील कर्मचारी, शिक्षकांना 1982 ची जूनी पेन्शन व 1984 ची भविष्य निर्वाह निधी योजना लागू करण्यासाठी महात्मा गांधी जयंतीच्या पार्श्वभूमीवर दि.02 आक्टोबर 2024 पासून वर्धा येथे महाराष्ट्र राज्य  जूनी पेन्शन हक्क संघटनेने आयोजित केलेल्या बेमुदत आमरण उपोषण आंदोलनाला महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचा सक्रिय पाठिंबा जाहीर करण्यात आला.वेळप्रसंगी शिक्षक परिषदेचे पदाधिकारी सुध्दा या आमरण उपोषणाला बसणार असे सांगीतले.समान काम समान वेतन मिळालेच पाहीजे. अशैक्षणिक कामे देण्यात येऊ नये.आम्हाला मुलांना शिकवु दया.अनेक मान्यवरानी आपले मनोगत माडंले. या प्रसंगी नागपूर विभागाचे अध्यक्ष मा. अजय वानखेडे, विभागाचे कार्यवाह मा.सुभाष गोतमारे, विभागाच्या सहकार्यवाह मा.सौ.मनिषा साळवे, चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष मा.विलास खोंड,वर्धा जिल्हा कार्यवाह मा.प्रदीप झलके, वर्धा जिल्हा कोषाध्यक्ष मा.सुधीर राठोड, वर्धा जिल्हा महिला आघाडी प्रमुख मा.सौ.शुभांगी चिकटे,वर्धा जिल्हा माजी कार्यवाह मा.सुरेश रोठे, गोंदिया जिल्हा कोषाध्यक्ष मा.गजानन चंदीवाले  व इतर पदाधिकारी या प्रसंगी उपस्थित होते.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page