Tuesday, December 9, 2025
HomePoliceबल्लारपूर पोलीसांनी जप्त केला घातक हत्यारांचा साठा !
spot_img

बल्लारपूर पोलीसांनी जप्त केला घातक हत्यारांचा साठा !

बल्लारपूर पोलीसांनी जप्त केला घातक हत्यारांचा साठा !

श्रेयश वानखेडे:-
बल्लारपूर पोलीसांनी धडक कारवाई करत शस्त्र साठा सहित दोन आरोपींना काल रात्री अटक केले.
        बल्लारपूर पोलीसांना बुधवार, ९ ऑक्टोबर रोजी रात्री ९ – १० वाजताच्या सुमारास गुप्त खबरे वरून आकाश उर्फ पिंटु प्रमोद बरडे, रा. श्रीराम वार्ड, बल्लारपुर, जि. चंद्रपूर याचे राहते घरी कायदेशिर कियारितीप्रमाणे घरझडती घेतली असता एकुण ६ लोखंडी तलवार, १ भाला व १ कुकरी असा घातक हत्यारांचा साठा घटनास्थळ जप्ती केले. पंचनाम्याप्रमाणे जप्त करून पो स्टे ला अप क ९४५/२०२४, कलम ४, २५ भारतिय हत्यार कायदयान्वये गुन्हा नोंद करण्यात आला. सदर कार्यवाहीत एकुण दोन आरोपी नामे प्रमोद श्रीहरी बरडे वय ५८ वर्षे, आकाश उर्फ पिंटू प्रमोद बरडे, वय ३० वर्ष, दोन्ही रा. श्रीराम वार्ड, बल्लारपुर यांना ताब्यात घेवून अटक करण्यात आली. सदर गुन्हयाचा तपास सुरू आहे.
सदर ची कार्यवाही ही पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन,  अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी राजुरा दिपक साखरे यांचे मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक सुनिल विठ्ठलराव गाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक ए.एस. टोपले, पोलीस उपनिरिक्षक हुसेन शहा, स.फौ. गजानन डोईफोडे, आनंद परचाके, पोहवा. रणविजय ठाकूर, सत्यवान कोटनाके, संतोष दंडेवार, सुनिल कामतकर, पुरूषोत्तम चिकाटे, पो. अंमलदार शेखर माथनकर, शरदचंद्र कारूष, विकास जुमनाके, वशिष्ठ रंगारी, मिलींद आत्राम, खंडेराव माने, लखन चव्हान, म.पो. अंमलदार अनिता नायडू, तसेच चालक पो अंमलदार वामन शेंडे, भाष्कर कुंदावार, परमविर यादव, कैलाश चिंचवलकर, विकास खंदार, विना एलकुलवार, इत्याद्दी पो. स्टाफ यांनी अतिशय कुशलतेने गुन्हा उघडकीस आणला आहे.

 

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page