Friday, December 12, 2025
HomeEducationसेंट विसेंट पलोटी कॉलेज ऑफ इंजिनीयरिंग अँड टेक्नॉलॉजी नागपूर येथील विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी...
spot_img

सेंट विसेंट पलोटी कॉलेज ऑफ इंजिनीयरिंग अँड टेक्नॉलॉजी नागपूर येथील विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी सुधाकर अडबाले आमदार सरसावले

सेंट विसेंट पलोटी कॉलेज ऑफ इंजिनीयरिंग अँड टेक्नॉलॉजी नागपूर येथील विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी सुधाकर अडबाले आमदार सरसावले

श्रेयश वानखेडे: 

नागपुरातील सेंट विसेंट पलोटी कॉलेज ऑफ इंजिनीयरिंग अँड टेक्नॉलॉजी नागपूर येथे शिकत असलेल्या एका विद्यार्थिनीसोबत कॉलेजबाहेरील परिसरात मागील वर्षी गैरवर्तणूक प्रकार घडला होता. सदर कॉलेजपासून रोड पर्यंतचे अंतर जवळपास 2 किलोमीटर असून रस्ता सुनसान असतो तसेच आजूबाजूला जंगल आहे. करिता विद्यार्थिनींच्या सोयीसाठी मुलींच्या होस्टेल प्रशासनाने ऑटो सुरू केला होता. परंतु चालू सत्रापासून मुलींच्या होस्टेलपर्यंतचा ऑटो बंद केलेला आहे.
त्यामुळे मुख्य रस्त्यापासून होस्टेलपर्यंत ये-जा करताना विद्यार्थिनींना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. ज्या परिसरात सदर घटना घडली होती, त्या ठिकाणावरून मुलींना एकटे जाणे-येणे करावे लागत आहे.
करिता विद्यार्थिनींच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सेंट विसेंट पलोटी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नोलॉजी नागपूर येथील विद्यार्थिनींना मुख्य रस्त्यापासून होस्टेल पर्यंत ये-जा करण्याकरीता आपल्या स्तरावरून उपाययोजना करण्यात यावी किंवा संबंधित व्यवस्थापनास तसे निर्देश द्यावे व सदर कारवाईबाबत अवगत करावे.
अशी मागणी आमदार सुधाकर अडबाले विधान परिषद सदस्य महाराष्ट्र राज्य यांनी माननीय पोलीस अधीक्षक नागपूर शहर नागपूर यांना जावक क्रमांक:1374/2024 दिनांक: 01/09/2024 रोजी केली आहे. तशी प्रतिलिपी मान. जिल्हाधिकारी नागपूर यांना देण्यात आलेली आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page