जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर या शाळेत पालक शिक्षक सभा संपन्न
श्रेयश वानखेडे:
जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर या शाळेत दिनांक: 10/12/ 2024 रोज मंगळवार ला सत्रातील दुसरी पालक शिक्षक सभा घेण्यात आली. पालक शिक्षक सभेच्या अध्यक्षस्थानी मान. बी. बी. भगत मुख्याध्यापक तर प्रमुख पाहुणे श्री. एम. डी. टोंगे माजी मुख्याध्यापक, सौ. एस. एन. लोधे मॅडम, सौ. माया कस्तुरे, श्री. रामाजी उईके, सौ. मनीषा महानंद यांची मंचावर उपस्थिती होती.
प्रथमता: मंचावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या फोटोची पूजा चर्चा करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. वर्ग दहावीच्या विद्यार्थ्यांना श्री. टोंगे सर, श्री. वानखेडे सर यांनी मार्गदर्शन केले. शाळेच्या विद्यार्थिनींनी जे बस समस्या बाबत प्रश्न विचारले होते त्याचे निराकरण सभाध्यक्ष मान. बी. बी. भगत सर यांनी केले.
नवोदय व महाराष्ट्र शासन शिष्यवृत्ती परीक्षेबाबत श्री. वानखेडे सर यांनी मार्गदर्शन केले.
सौ. लोधे मॅडम यांनी आपल्या भाषणात सांगितले की, शिक्षणातूनच आपली प्रगती होत असते यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांनी शिक्षण घेणे गरजेचे आहे. प्रमुख पाहुणे श्री. टोंगे सर यांनी सांगितले की, चांगले मार्क आणण्यासाठी अभ्यास करावा लागतो आहे. अध्यक्ष मान. बी. बी. भगत मुख्याध्यापक यांनी सांगितले की, समस्यांतून प्रगती होत असते अडचणींचा सामना करण्यात आपल्याला सक्षम करावे. शालेय शिक्षण घेणे गरजेचे असते त्यातूनच विद्यार्थी घडत असतो.
पालक शिक्षक सभेचे प्रास्ताविक व संचालन श्री. आर. के. वानखेडे व आभार प्रदर्शन एस. एम. चव्हाण सर यांनी केले. सभेत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी श्री. गणेश चंदावार, श्री. जगदीश कांबळे, श्री. वामन बोबडे, श्री. वाल्मीक खोंडे, श्री इंद्रभान अडबाले व विद्यार्थी उपस्थित होते.