Monday, September 21, 2026
spot_img
HomeEducationजनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर येथे अल्पसंख्यांक अधिकार दिवस साजरा

जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर येथे अल्पसंख्यांक अधिकार दिवस साजरा

जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर येथे अल्पसंख्यांक अधिकार दिवस साजरा

श्रेयश वानखेडे:
जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर येथे अल्पसंख्यांक अधिकार दिवस दिनांक: 18/ 12/ 2024 रोजी साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बी. बी. भगत मुख्याध्यापक, प्रमुख पाहुणे म्हणून एम. डी. टोंगे माजी मुख्याध्यापक, यु. के रांगणकर सर यांची मंचावर उपस्थिती होती.
प्रथमता: मंचावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भारताचे माजी  राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या फोटोला पूजा करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
 रांगणकर सर यांनी सांगितले की, अल्पसंख्यांकांसाठी मंत्रालय व आयोग स्थापन करण्यात आलेले आहे. इतर समाजाच्या बरोबर आपल्याला स्थान निर्माण  साठी  याची रचना करण्यात आलेली आहे. त्यांचे हक्क आणि संरक्षण करण्याची जिम्मेदारी साठी हा दिवस साजरा करण्याची आवश्यकता आहे.
यानंतर एम. डी. टोंगे सर माजी मुख्याध्यापक,  एस. एम. चव्हाण सर यांनी सुद्धा आपले मते व्यक्त केलीत.
आपले अध्यक्षीय भाषण करताना बी. बी. भगत मुख्याध्यापक यांनी सांगितले की, मनुष्य जर जागरूक असेल तर तो आपले काटेकोरपणे काम करू शकतो. जर तो स्पर्धेत टिकला नाही तर आपल्या मागे असलेल्या अडचणीत राहतो. अल्पसंख्यांक समाजाला समान संधी व अधिकार मिळवण्यासाठी या दिवसाची जनजागृतीसाठी आवश्यकता आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आर. के. वानखेडे, संचालन एस. एन. लोधे मॅडम तर आभार प्रदर्शन एस. एम. चव्हाण सर यांनी केले.कार्यक्रमात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी जगदीश कांबळे,  वामनभाऊ बोबडे,  वाल्मीक खोंडे,  इंद्रभान अडबाले तथा विद्यार्थी गण उपस्थित होते. कार्यक्रमाचे शेवटी विद्यार्थ्यांना चॉकलेटचे वाटप करण्यात आले.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page