शालेय सांस्कृतिक कार्यक्रमातून नवोदित कलाकार तयार होत असतो : अंबर जीवतोडे
श्रेयश वानखेडे:
जनता कनिष्ठ महाविद्यालय, गोंडपिपरी येथे वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम ” उडान २०२४-२५ ” चे आयोजन दिनांक ३० डिसेंबर २०२५ ला पार पाडले, याप्रसंगी त्यांनी प्रतिपादन केले.
कार्यक्रमा प्रसंगी चांदा शिक्षण प्रसारक मंडळ, चंद्रपूर चे उपाध्यक्ष श्री.अंबर अशोक जीवतोडे हे कार्यक्रमाचे उद्घाटक तर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य विकास कोकाटे, उपमुख्याध्यापिका चित्रा धकाते, पर्यवेक्षक शांताराम काळे, कनिष्ठ महाविद्यालयाचे पाळी प्रमुख संतोष बांदुरकर, माजी प्राचार्य श्री. सुरेश पेंढारकर, सांस्कृतिक प्रमुख प्रशांत नारनवरे हे मंचावर उपस्थित होते.
शिक्षण महर्षी श्रीहरी जीवतोडे गुरुजी व मातोश्री लीलाई यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी उपस्थित सर्वांचे स्वागत स्वागतगीत तथा स्वागत नृत्याने करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविकेतून प्रा. संतोष बांदूरकर यांनी कनिष्ठ महाविद्यालयामध्ये होत असलेल्या विविध शालेय उपक्रम, स्पर्धा ई . विषयी माहिती सांगितली. कार्यक्रमाचे उद्घाटक श्री. अंबर जीवतोडे यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनामध्ये श्रम घेऊन स्वतःची प्रगती करावी व स्वतःमध्ये असलेले कला गुण जोपासल्यास नवोदित कलाकार निर्माण होत असतो असे प्रतिपादन उद्घाटनाप्रसंगी केले. प्राचार्य विकास कोकाटे यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. यानंतर विविध कला, कौशल्या वर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. यामध्ये राजस्थानी नृत्य ,तांडव, लावनी, नाटक, गीत ई. कार्यक्रमाचे रंगारंग आयोजन व सादरीकरन करण्यात आले. कार्यक्रमांचे परीक्षक म्हणून
सौ. लाडे मॅडम व श्री.पेंढारकर सर यांनी काम पाहिले .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रशांत नारनवरे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. नंदकिशोर तीतरमारे यांनी केले. कार्यक्रमाला जनता विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयातील प्रा. नंदकिशोर दिवसे ( व्होकेशनल विभाग प्रमुख) प्रा. अजय काळे, प्रा. गालपलीवार, प्रा. मोरे, प्रा. बोबडे, प्रा. विरुटकर प्रा. पिंपळकर प्रा. ठाकरे, विवेकानंद काळे, प्रा. वासेकर, प्रा. गावंडे, प्रा. बेझलवार मॅडम, प्रा. साठे मॅडम, प्रा. जीवतोडे मॅडम, श्री. आकुलवार , श्री. सारंग गौरकार बाबूजी, श्री. धोटेकर व जनता कनिष्ठ तथा विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी, विद्यार्थिनी इत्यादींनी मोलाचे सहकार्य केले.