Sunday, December 7, 2025
HomeEducationमाध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर येथे माहिती अधिकाऱ्याद्वारे मनमानी सुरू
spot_img

माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर येथे माहिती अधिकाऱ्याद्वारे मनमानी सुरू

माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर येथे माहिती अधिकाऱ्याद्वारे मनमानी सुरू

माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर या कार्यालयाच्या ठिकाणी  माहिती अधिकारी कार्यरत आहे. त्यांनी राज्य माहिती आयोगाच्या आदेशाला केराची टोपली दाखवणे सुरू केले  असून त्यांना राज्य माहिती आयोगाने आदेश प्राप्त होता दोन आठवड्याच्या आत खुलासा मागितला होता. परंतु त्यांनी आयोगाच्या कार्यालयात आपलं तोंड सुद्धा दाखवलं नसल्याची चर्चा सुरू आहे.
त्या  प्रकरणात प्राधिकरणाला यावर काही म्हणायची नाही असा निष्कर्ष दुर्दैवाने नोंदवावा लागेल, जवळजवळ दीड वर्षाचा कालावधी उलटल्यानंतरही जन माहिती अधिकारी शिक्षण विभाग (माध्यमिक ) चंद्रपूर व शिक्षणाधिकारी (माध्यमिक) चंद्रपूर  यांच्यावतीने कोणताही खुलासा सादर करण्यात आलेला नाही. केवळ नैसर्गिक न्यायतत्वाला अनुसरून उपरोक्त खुलासा सादर करण्याची अंतिम संधी देण्यात आलेली आहे. उपरोक्त आदेशानुसार तत्कालीन जन माहिती अधिकारी व तत्कालीन प्रथम अपिलीय अधिकारी यांनी त्यांचा स्वयंस्पष्ट खुलासा सदर आदेश प्राप्त होताच  दोन आठवडयाच्या आत आयोगाला व्यक्तीश: उपस्थित राहून सादर करावा असा आदेश दिनांक 23 सप्टेंबर 2024 ला जावक क्रमांक 6838 नुसार दिला आहे.
परंतु माहिती अधिकाऱ्याला पैसे खाण्याशिवाय दुसरा रस्ता दिसत नसल्याची चर्चा सुरू आहे आताही पद गेल्यानंतरही ट्रिप च्या परवानगी मधून पैसे खाणे सुरू असल्याची चर्चा आहे. तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन केस नागपूरला पाठवण्यासाठी बाबूच्या माध्यमातून 1000/- घेत असल्याची फिफ्टी-फिफ्टी पर्सेंट करत असल्याची चर्चा सुरू आहे.
या माहिती अधिकार्यानी दहावी/ बारावी परीक्षा मार्च 2024 वेळेस, जे पथक यांनी स्थापन केलं होतं,  त्यावेळी गोंडपिंपरीच्या परीक्षा सेंटरवर पैसे खाऊन, तेथील एका धाब्यावर आपल्या मित्राच्या साह्याने कोंबडीची पार्टी खाल्ली असल्याची चर्चा सुरू आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page