Friday, May 1, 2026
HomeParbhaniसेलू बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद.
spot_img

सेलू बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद.

सेलू बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद.

व्यापार्‍यांसहित सर्व प्रतिष्ठान कडकडीत बंद. 

स्व. संतोष देशमुख हत्येचा खटला फास्ट्रॅक कोर्टात चालविण्याची मागणी.

श्रेयश वानखेडे:
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच स्व. संतोष देशमुख यांच्या हत्त्या प्रकरणात जलद गतीच्या न्यायालयात खटला चालवावा व मारेकर्‍यांना फाशीची शिक्षा द्यावी, यासह अन्य मागण्यांसाठी सकल मानवतावादी नागरिकांच्यावतीने शुक्रवार 7 मार्च रोजी सेलू शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला.
यावेळी सकल मानवतावादी नागरिकांच्यावतीने तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना मागण्यां चे निवेदन सादर करण्यात आले. त्याद्वारे,बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच स्व. संतोष देशमुख यांच्या हत्येचे समाज माध्यमांमध्ये फोटो व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण राज्यसह सेलू तालुक्यामध्ये आरोपी विरोधात संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे या प्रकरणातील दोषींना कठोरात कठोर शिक्षा मिळावी, हत्येप्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून दोषींना तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी.
हत्येच्या दिवशी आरोपींना सहकार्य करणारे सर्व पोलीस काही दोषी राजकीय नेते त्यांनाही सह आरोपी करत पुरवणी आरोपत्रात त्यांची नावे घेत इतर आरोपींना तात्काळ अटक करून कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात आली.दरम्यान, या मागण्यांच्या समर्थनार्थ आणि स्व. संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी सेलू तालुक्यातील सकल मानवतावादी नागरिकांनी एकत्र येत शहर कडकडीत बंदचे आवाहन केले होते. या आवाहनाला व्यापार्‍यां नी चांगला प्रतिसाद देत आपापली प्रतिष्ठाने बंद ठेऊन सहकार्य केले. बंद अतिशय शांततेत पार पडला.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page