Monday, May 4, 2026
Homeबल्लारपूरआ.सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने कंत्राटी कामगारांचा झाला सन्मान
spot_img

आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने कंत्राटी कामगारांचा झाला सन्मान

आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने कंत्राटी कामगारांचा झाला सन्मान

६५ व्या महाराष्ट्र  दिनानिमित्त तसेच जागतिक कामगार दिनानिमित्त आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या कडून कंत्राटी कामगारांचा सत्कार सोहळा संपन्न

Shreyash Wankhede:
आमदार सुधीर मुनगंटीवार मित्र परिवार आणि भारतीय जनता पार्टी मूल यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र दिनानिमित्त तसेच आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त मूल येथील निर्मानाधीन उपजिल्हा रुग्णालयात मूल येथील कामगारांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाची सुरवात कामगारांच्या हातून  दीपप्रज्वलन करून झाली. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रवीण मोहूर्ले यांनी केले. या कार्यक्रमात माजी जिल्हापरिषद अध्यक्ष संध्या गुरनुले, जिल्हा महामंत्री डॉक्टर मंगेश गुलवाडे, शहर महामंत्री किरण बुटले, मूल शहराध्यक्ष प्रभाकर भोयर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी उपजिल्हा रुग्णालय मूल येथे बांधकाम करणाऱ्या महिला व पुरुष कामगारांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.  माजी नगराध्यक्ष रत्नमाला भोयर, वंदना वाकडे, मोती टेहलानी, अलका चौधरी, सुधाकर मोहूर्ले, हर्षल गांडलेवार, आयशा शेख, युवराज चावरे, किरण कापगते, अनिता दूमेंवार, सुनील तरोने, युवराज चवरे, संतोष कापुलवार, पंकज लांडवे, माला माणिकपुरी, सीमा धुर्वे यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शीतल कातकर यांनी केले. आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्याकडून कंत्राटी कामगारांचा सत्कार झाल्याबद्दल उपस्थित कामगारांनी आनंद व्यक्त केला.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page