Tuesday, May 5, 2026
HomeParbhani1ली खेलो इंडिया बिच सेपक टकारा क्रीडा स्पर्धा दिव येथे होणार .
spot_img

1ली खेलो इंडिया बिच सेपक टकारा क्रीडा स्पर्धा दिव येथे होणार .

1ली खेलो इंडिया बिच सेपक टकारा क्रीडा स्पर्धा दिव येथे होणार.

गणेश माळवे प्रशिक्षक तर दर्शन हस्ती सह प्रशिक्षक पदी नियुक्ती.

श्रेयश वानखेडे:

भारत सरकार खेलमंत्रालय व क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे वतीने  1 ल्या खेलो इंडिया बीच सेपक टकारा क्रीडा स्पर्धा  (दिव ) येथे दि. 19 ते 24 मे दरम्यान संपन्न होणार आहेत. होणाऱ्या स्पर्धेसाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रायगड वतीने महाराष्ट्र राज्य बीच सेपक टकारा संघाचे प्रशिक्षण शिबिर दि. 12 ते 17 मे दरम्यान संपन्न होणार आहे. 1 ल्या खेलो इंडिया बिच सेपक टकारा क्रीडा स्पर्धे साठी संघ प्रशिक्षक म्हणून गणेश माळवे, नूतन विद्यालय सेलू व संघ सह प्रशिक्षक पदी दर्शन हस्ती वर्धा यांची निवड झाली आहे.गणेश माळवे हे क्रीडा शिक्षक म्हणून नूतन विद्यालय सेलू येथे कार्यरत आहे. महाराष्ट्र राज्य सेपक टकारा संघटनेचे कार्यकारिणी सदस्य व परभणी जिल्हा सचिव म्हणून काम पाहत आहेत.  38 वी नॅशनल गेम्स उत्तराखंड येथे महाराष्ट्र राज्य संघ व्यवस्थापक म्हणून कार्य केले.7 वी खेलो इंडिया युथ गेम्स बिहार साठी महाराष्ट्र राज्य संघ निवड समिती सदस्य म्हणून काम पाहिले आहे.दर्शन हस्ती अवधेश क्रीडा मंडळ वर्धा, सेपक टकरा राष्ट्रीय खेळाडू असून त्यांनी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत व 7 वी खेलो इंडिया युथ गेम्स बिहार येथे प्रशिक्षक म्हणुन कार्य केले आहे. त्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्य संघास कांस्यपदक मानकरी ठरला आहे.68 राष्ट्रीय शालेय सेपक टकारा क्रीडा स्पर्धा 2024 25 मणिपूर या ठिकाणी आयोजित करण्यात आल्या होत्या या स्पर्धेमध्ये वयोगट 19 मुले महाराष्ट्र संघाने तृतीय क्रमांकाचे स्थान पटकावले त्या संघाच्या प्रशिक्षक पदी माझी नियुक्ती करण्यात आली होती.

क्रीडा आयुक्त हिरालाल सोनवणे, सहसंचालक क्रीडा सुधीर मोरे, जिल्हा क्रीडा अधिकारी प्रकाश वाघ, सेपक टकारा संघटनेचे अध्यक्ष  विपीन कामदार, सरचिटणीस डॉ.योगेंद्र पांडे, डॉ . अमृता पांडे, प्रविण कुपटीकर, डॉ .विनय मुन,शेख चाँद, रवि बकवाड,परवेज खान,  अप्पर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे डॉ. एस. एम. लोया, डी. के. देशपांडे, डॉ.व्ही. के.कोठेकर, जयप्रकाशजी बिहाणी, जिल्हा क्रीडा अधिकारी गीता साखरे राज्य क्रीडा मार्गदर्शक संजय मुंढे, रणजीत काकडे, पांडुरंग रणमाळ, मुख्याध्यापक संतोष पाटील, उपमुख्याध्यापक किरण देशपांडे रोहिदास मोगल, प्रशांत नाईक, संजय भुमकर , डी.डी. सोन्नेकर, प्रा.नागेश कान्हेकर यांनी व विविध क्रीडा संघटनाच्या वतीने अभिनंदन करुन पुढील स्पर्धेस शुभेच्छा दिल्या.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page