१५ कुटुंबांना १ कोटी २६ लाख ९० हजारांची नुकसानभरपाई मंजूर
रेल्वे अधिग्रहणासाठी पटेल नगरमधील १५ अतिक्रमणधारकांना मिळणार मोबदला
आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मिळाले मोठे यश आ. मुनगंटीवार यांचे पटेल नगरवासियांनी मानले आभार
Shreyash Wankhede: चंद्रपूर येथील पटेल नगरच्या १५ घरांना रेल्वे अधिग्रहणाच्या माध्यमातून प्रत्येकी ८ लक्ष ४६ हजाराच्या दराने एकूण १ कोटी २६ लक्ष ९० हजार इतकी रक्कम नुकसानभरपाई मंजूर झाली आहे. राज्याचे माजी वने, सांस्कृतीक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकारी यांच्या सोबत दोनदा बैठका घेऊन राज्यसरकारकडे केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे पटेलनगर येथील पंधरा कुटुंबांना यामुळे दिलासा मिळणार आहे.
केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त धोरणांतर्गत, नागरी प्रकल्पांसाठी आवश्यक शासकीय जमिनीवरील अतिक्रमणांबाबत ठोस निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार, ज्या अतिक्रमणधारकांनी वास्तव्यासाठी बांधकाम केले आहे, त्यांना प्रत्येकी ₹८.४० लाखांची संपूर्ण रक्कम दिली जाणार आहे.
आ. सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भात बैठक घेऊन राज्य सरकारच्या नगरविकास विभागाकडे पाठपुरावा केला. यासाठी उपमुख्यमंत्री ना.श्री. एकनाथजी शिंदे यांना पत्रव्यवहार करत सर्व १५ कुटुंबांना मोबदला मिळण्याची मागणी केली. आ. मुनगंटीवार यांच्या मागणीची दखल घेत मोबदला देण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले.
या निर्णयामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील नागरी भागातील पुनर्वसनाच्या प्रयत्नांना गती मिळणार आहे. सातत्यपूर्ण पाठपुराव्याबद्दल नागरिकांनी आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले आहेत.