Thursday, April 30, 2026
HomeParbhaniअपुर्वा पॉलिटेक्निक, सेलू मधील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश!
spot_img

अपुर्वा पॉलिटेक्निक, सेलू मधील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश!

अपुर्वा पॉलिटेक्निक, सेलू मधील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश!

श्रेयश वानखेडे: महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या डिप्लोमा परीक्षेचा निकाल २० जून २०२५ रोजी जाहीर झाला .अपुर्वा पॉलिटेक्निक, सेलू संस्थेच्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. सिव्हिल, इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल या तिन्ही शाखांतील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय टक्केवारीने उत्तीर्ण होत संस्थेची शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध केली आहे.यामध्ये अनुक्रमे गणगे गोकर्णा दत्तात्रय 87.08%,  डांगरे अभिनव गणेश 84.22% व चाळक अश्विनी राजेभाऊ – 82%, या विद्यार्थ्यांनी  महाविद्यालयातून प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला आहे.तसेचसिव्हिल इंजिनिअरिंग विभागातील  कावले ओम 75.11% ,बारबिंड शरद75%, गंधाला पुष्पांजली – 75%, चव्हाण आकाश –70.67%, गुळवे शिल्पा – 70%, मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील डांगरे अभिनव – 84.22%,रोडगे सुदर्शन– 70.78% ,साखरे कीर्ती विष्णू  76%गणगे गोकर्णा – 87.08%, चालक अश्विनी – 82%,पवार लहू – 76.56%, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभाग कवळे शिवानी  – 77.47%,सपाटे राजकुमार – 75%,पारधे महेश  – 77.72%,अर्दड श्रेयस – 71.61% विद्यार्थ्यांनी गुण मिळून विशेष प्राविण्यसह उत्तीर्ण झाले.श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ.संजय रोडगे या प्रसंगी बोलतांना म्हणाले की, अपुर्वा पॉलि टेक्निकचे विद्यार्थी प्रत्येक परीक्षेत गुणवत्ता सिद्ध करत आहेत. यावेळेचा निकालही आमच्यासाठी अत्यंत गौरवास्पद आहे. विद्यार्थी, पालक व शिक्षकांचे योगदान हेच आमच्या यशाचे खरे श्रेय आहे.संस्थेचे उद्दिष्ट नेहमी गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे हेच राहिले आहे. विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश हे आमच्या शिक्षणपद्धती व प्रयत्नांचे फलित आहे. सर्व विद्यार्थ्यांचे मन:पूर्वक अभिनंदन.”या प्रसंगी श्रीराम प्रतिष्ठानच्या सचिव डॉ.सौ सविताताई रोडगे, प्रशासकीय अधिकारी प्रा.महादेव साबळे प्राचार्य प्रा.अशोक बोडखे ,उप प्राचार्य प्रा.गजानन जाधव, सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक व इतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांचे कौतुक केले.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page