Tuesday, August 4, 2026
spot_img
Homeबल्लारपूरबल्लारपूर येथे आम आदमी पक्षाकडून ७९ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.

बल्लारपूर येथे आम आदमी पक्षाकडून ७९ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.

बल्लारपूर येथे आम आदमी पक्षाकडून ७९ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.

श्रेयश वानखेडे: ज्या शांतीनगर परिसराकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते, त्या ठिकाणी आम आदमी पक्षाने यंदाही ७९ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. सकाळी ठीक ९.०० वाजता ध्वजारोहण करण्यात आले. ​यावेळी आम आदमी पक्षाचे शहर अध्यक्ष रवि पुप्पलवार म्हणाले, “बल्लारपूर शहरात ३२ वार्ड आणि अनेक चौक असतानाही आम्ही गेल्या सहा वर्षांपासून सातत्याने शांतीनगर परिसरात स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. यामागचा मुख्य उद्देश म्हणजे, आपल्या शहरात असलेला हा ‘शांतीनगरच्या’ नावाला असलेला डाग पुसून काढणे. येथील लोकांमध्ये सकारात्मकता आणि संवेदनशीलता निर्माण करून त्यांना शहराच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आम्ही हे कार्यक्रम इथे आयोजित करतो.” ​कार्यक्रमाचे आयोजन पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अत्यंत सुंदर पद्धतीने केले. यात लहान मुलांनी देशभक्तीपर गीतांवर नृत्य सादर केले. कार्यकर्त्यांनीही गाणी गायली आणि मंचावर उपस्थिति अतिथी व “AAP” नेत्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
​या कार्यक्रमाला आम आदमी पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते. हा कार्यक्रम बालाजी वार्ड, शांतीनगर परिसर, ग्रामीण रुग्णालय मागे, बल्लारपूर येथे आयोजित करण्यात आला होता.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page