
Jyotsna Wankhede : श्रीराम प्रतिष्ठान अंतर्गत प्रॉस्परस पब्लिक स्कूल सेलू येथे आज राष्ट्रीय हिंदी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात संत कबीरदास यांच्या प्रतिमापूजन आणि झाली तसेच दरवर्षी १४ सप्टेंबर रोजी साजरा होणाऱ्या या दिवसाचे औचित्य साधून शाळेत विविध कार्यक्रमां चे आयोजन करण्यात आले होते. हिंदी ही भारताची राजभाषा म्हणून १९४९ मध्ये स्वीकारली गेली, या दिवसाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देणे आणि भाषेबद्दल त्यांच्यात आवड निर्माण करणे हा या कार्यक्रमांचा मुख्य उद्देश होता. यानिमित्ताने शाळेच्या प्रांगणात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी हिंदी भाषेच्या महत्त्वावर एक प्रभावी भाषण दिले. तसेच, ‘हिंदी भाषेचे महत्त्व’ या विषयावर एक निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, ज्यात अनेक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी एक काव्यवाचन स्पर्धा आणि हिंदी संवाद-लेखन कार्यशाळा देखील आयोजित करण्यात आली. कार्यक्रमाची सांगता हिंदी गीतांच्या सादरी करणाने झाली. हिंदी विभाग प्रमुख सौ गायत्री हरदेकर यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना हिंदी भाषेचा आदर करण्यास आणि तिच्या अभ्यासाला प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये हिंदी भाषेविषयी प्रेम आणि आदर निर्माण झाला आहे, असे त्यांनी नमूद केले.यावेळेस श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक डॉ. संजय रोडगे तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. प्रगती क्षीरसागर व इतर शिक्षकवृंद उपस्थित होते.