Friday, December 12, 2025
Homeबल्लारपूरवंचित बहुजन आघाडी बल्लारपूरचा तालुका व शहर " सत्ता संपादन कार्यकर्ता मेळावा...
spot_img

वंचित बहुजन आघाडी बल्लारपूरचा तालुका व शहर ” सत्ता संपादन कार्यकर्ता मेळावा ” दिनांक 23 रोजी

वंचित बहुजन आघाडी बल्लारपूरचा तालुका व शहर ” सत्ता संपादन कार्यकर्ता मेळावा ” दिनांक 23 रोजी

Jyotsna Wankhede:
वंचित बहुजन आघाडी बल्लारपूरचा तालुका व शहर चा ” सत्ता संपादन कार्यकर्ता मेळावा ” दिनांक 23 ऑक्टोंबर गुरुवार 2025 ला श्री मंगल कार्यालय काटा गेट जवळ मेन रोड बल्लारपूर येथे दुपारी 12.00 वाजता आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याकरिता पुर्व विदर्भ अध्यक्ष मा. भगवानभाऊ भोंडे तसेच राज्य कार्यकारणी सदस्य मा. कुशलभाऊ मेश्राम सोबत विदर्भ संयोजक मा. विवेकभाऊ हाडके, मा.अरविंदजी चांदेकर, मा. हितेश मडावी, मा. प्रफुलजी मानके, मा. बाळूभाऊ टेंभुर्डे, मा. प्रकाशजी तावडे, मा. कविताताई गौरकर, मा. शुभम मंडपे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित राहतील.
 बल्लारपूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुका तसेच जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपंचायत यांच्या सार्वत्रिक निवडणुका यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे संघटन मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून या मेळाव्याचे भव्य आयोजन करण्यात आलेले आहे. वरील मान्यवरां सोबतच पक्षाचे तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, जिल्हा पदाधिकारी तसेच सर्व  कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्याच्या माध्यमातून बल्लारपूर शहरातील जनतेला विशेष करून 2019 ची लोकसभा विधानसभा निवडणूक पुन्हा आठवायला लागेल. अशी परिस्थिती बल्लारपूर शहरात पुन्हा निर्माण होईल व येत्या नगरपालिका निवडणूकीसाठी वंचित बहुजन आघाडीचे संघठन अत्यंत सामर्थ्याने निवडणुकीला सामोरे जात आहे व असा आत्मविश्वास कार्यकर्त्यांमध्ये निर्माण होऊन आम्हीच बल्लारपूर नगर परिषदेचे सत्ता संपादन करू असा ठाम विश्वास व्यक्त करीत शहरातील तसेच तालुक्यातील कार्यकर्त्यांनी समर्थकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान एका पत्रकाद्वारे शहराध्यक्ष उमेश कडू यांनी केले आहे अशी माहिती शहर महासचिव गौतम रामटेके यांनी एका पत्रकाद्वारे दिली.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page