Saturday, December 6, 2025
HomeEducationकेजीएन पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, बल्लारपूर येथे संविधान दिन साजरा
spot_img

केजीएन पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, बल्लारपूर येथे संविधान दिन साजरा

केजीएन पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, बल्लारपूर येथे संविधान दिन साजरा

Jyotsna Wankhede:
केजीएन पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज येथे दिनांक: २६ नोव्हेंबर २०२५ रोजी संविधान दिन मोठ्या उत्साहात आणि सन्मानाने साजरा करण्यात आला.
भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब  आंबेडकर यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी संविधानाच्या प्रस्तावनेचे सामूहिक पठण केले.
शाळेचे संस्थापक श्री. शेख महमूद याप्रसंगी उपस्थित होते आणि त्यांनी विद्यार्थ्यांना संविधानाचे महत्त्व आणि लोकशाही मूल्यांची जाणीव करून देण्यास प्रोत्साहित केले.
शाळेच्या प्राचार्या स्वाती वाघमारे, उपप्राचार्या सिमा माकडे आणि शिक्षिका श्वेता डोनिवार यांनीही विद्यार्थ्यांना संविधान, हक्क आणि कर्तव्ये याबद्दल मौल्यवान मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, निबंध, भाषणे आणि पोस्टर बनवणे यासारख्या उपक्रमांद्वारे संविधान दिनाचे महत्त्व मांडले.
कार्यक्रमात सर्व शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी उत्साहाने भाग घेतला. शेवटी, राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page